गावगाथा

हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हिरकणी सखी मंच्याकडून श्रीराम जन्मभुमी अयोध्या येथे श्रीराम मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त न्यासाच्या प्रांगणात भव्य दीपोत्सव..

लख..! लख..!! दिव्यांनी न्यासाचा परिसर उजळून निघाला

 

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हिरकणी सखी मंच्याकडून सोमवारी श्रीराम जन्मभुमी अयोध्या येथे श्रीराम मंदिर लोकार्पण व श्रीराम मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त न्यासाच्या प्रांगणात भव्य दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लख..! लख..!! दिव्यांनी न्यासाचा परिसर उजळून निघाला होता.*

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

दरम्यान न्यासाच्या प्रांगणात महाप्रसाद गृह समोरील कपिला गाय येथे दीप लाऊन भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. सदरचा कार्यक्रम संस्थेचे आधारस्तंभ व मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई भोसले यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.

HTML img Tag Simply Easy Learning    

श्रीराम मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त न्यास व हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भव्य दीपोत्सव या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, न्यासाच्या परिसरात विविध ठिकाणी दीपोत्सव करण्यात आले होते.
दरम्यान न्यासाच्या परिसरात हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हिरकणी सखी मंच्याकडून रांगोळी साकारून लक्षदिपोत्सव करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा अलकाताई भोसले, गीताताई अमोलबापू शिंदे सोलापूर, उपाध्यक्षा रत्नमाला मचाले, सचिवा अर्पिताराजे भोसले, नंदाताई चव्हाण सोलापूर, खजिनदार स्मिता कदम, मल्लम्मा पसारे, सुवर्ण साखरे, क्रांती वाकडे, संपदा श्रीमान, अंजना पवार, कल्पना मोरे, स्वाती निकम, राजश्री माने, रूपा पवार, छाया पवार, उज्वला भोसले, सुवर्णा घाटगे, कविता वाकडे यांच्यासह न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्यासह पदाधिकारी, सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button