गावगाथाठळक बातम्या

PCMC : कोयत्याने वार आणि दगडाने ठेचून ताडी विक्रेत्याची हत्या ; तळवडे येथील घटना

निगडी (प्रतिनिधी): तळवडे येथील कॅनबे चौकाजवळ पाच ते सहा जणांच्य टोळक्याने एका व्यक्तीची चाकू, कोयत्याने वार करून दगडाने ठेचून हत्या केली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

निलेश अशोक भंडारी ( रा.देहूगांव)  असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. निलेश याचे अधिकृत ताडी विक्री करण्याचे दुकान आहे. मेहुणा आणि निलेश दोघे दुचाकीवरून घरी जात असताना त्यांना अडवून हत्या केली आहे. ही हत्या पूर्ववैमनस्यातून घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. देहूरोड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश अशोक भंडारी याचा ओटास्कीम निगडी आणि देहू येथे अधिकृत ताडी विक्रीचा व्यवसाय आहे. मध्यरात्री बाराच्या सुमारास मेहुणा आणि मयत निलेश हे दोघे दुचाकीवरून देहूगाव येथे दुचाकीवरून घरी येत होते. तेव्हा, अज्ञात पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्यांचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून त्यांचा दुचाकीला धक्का देऊन खाली पाडले, मग मेहुण्यासमोरच निलेशची धारदार चाकू, कोयत्याने वार करून आणि दगड, सिमेंटच्या गट्टूने ठेचून हत्या केली. हत्या करून आरोपी हे फरार झाले असून त्यांचा शोध देहूरोड पोलीस घेत आहेत. ही घटना देहूगाव- तळवडे रस्त्यावर घडली आहे. ही घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button