गावगाथा

*वयाच्या ४९ व्या वर्षी तिने केले एव्हरेस्ट सर!*

*महाराष्ट्र पोलीस दलातील पहिली महिला अधिकारी*

 

*वयाच्या ४९ व्या वर्षी तिने केले एव्हरेस्ट सर!*

*महाराष्ट्र पोलीस दलातील पहिली महिला अधिकारी*

 

*नाशिक पोलीस :*

‘एव्हरेस्ट’ शिखर सर करण्याचे स्वप्न प्रत्येक गिर्यारोहक पाहत असतो.
मात्र ते शक्य होतेच असे नाही.
परंतु, महाराष्ट्र पोलीस अकादमीतील ४९ वर्षीय पोलीस निरीक्षक असलेल्या महिेलेने हे स्वप्न सत्यात साकरले आहे.
अशी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस दलातील त्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी आहेत.
यामुळे राज्यभरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होतो आहे.

द्वारका विश्वनाथ डोके या महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये पोलीस निरीक्षक तथा सहायक संचालक म्हणून कार्यरत आहेत.
द्वारका या केसापूर
(ता. राहुरी, जि. अहमदनगर)
येथील मूळ रहिवाशी आहेत.
२०२२ मध्ये त्यांच्या वाचनामध्ये एव्हरेस्ट मोहिमेसंदर्भात आले. तेव्हापासून त्यांना एव्हरेस्टबाबत कुतूहल निर्माण झाले.
याचवेळी त्यांनी दिवंगत आई-वडिलांना श्रद्धाजंली अर्पण करण्यासाठी एव्हरेस्ट सर करण्याचा संकल्प केला आणि त्या दृष्टीकोनातून तयारी सुरू केली.

२४ मार्च २०२४ रोजी त्या काठमांडू येथे पोहोचल्या.
एव्हरेस्ट शिखर सर करणारी कंपनीचे मालक लकपा शेरपा यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीमेला सुरुवातही झाली.
या मोहिमेत पासंग शेरपा हे द्वारका डोके यांच्यासमवेत शेवटपर्यंत सोबत होते.
१७ मे २०२४ रोजी त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प येथून चढाई सुरू केली.

२२ मे २०२४ रोजी पहाटेच्या ४ वाजून १० मिनिटांनी ते एव्हरेस्ट शिखरावर पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी भारताचा राष्ट्रीय ध्वज,
महाराष्ट्र पोलिस दलाचा ध्वज हातात घेत त्याठिकाणी राष्ट्रगीत म्हटले. तसेच, जो संकल्प त्यांनी केला, त्यानुसार आई-वडिलांचा फोटो हातात घेऊन त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या त्या महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी ठरल्या आहेत.
एव्हरेस्ट मोहीम फत्ते केल्याने पोलीस दलाकडून त्या त्यांचे कौतूक होते आहे.

*अशी केली तयारी*

द्वारका डोके यांनी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा संकल्प करताच.
त्या दृष्टीकोनातून तयारी सुरू केली. २०२३ मध्ये त्यांनी नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीतील मैदान व जिमचा सराव सुरू केला. एव्हरेस्ट सर करताना ज्या-ज्या शारीरीक कसरती कराव्या लागणार,
त्याची तयारी अकादमीत केली.

*मुळ गावी स्वागत*

२००६ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून द्वारका डोके या रुजू झाल्या असून सध्या त्या पोलीस निरीक्षक या पदावर आहेत.
२२ मे २०२४ रोजी एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर
त्या २३ मे २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहचल्या.
तर, त्यांच्या गावी सोमवारी २७ मे २०२४ सकाळी सात वाजता पोहोचताच त्यांचे जंगी मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button