गावगाथाग्रामीण घडामोडी
Akkalkot : गळोरगीच्या कन्या श्रेया हिला CET परिक्षेत ९९ टक्के तर महक हिला ९६ टक्के गुण ; ग्रामस्थांकडून कौतुकांचा वर्षाव
अक्कलकोट (प्रतिनिधी): तालुक्यातील गळोरगी या गावातील रहिवासी / विद्यार्थीनी कु. श्रेया सुरेश बिराजदार हिला MHT CET परिक्षेत तब्बल ९९.६७ टक्के तर कु. महक अकबर नदाफ हिला ९६.१६ टक्के गुण मिळाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गळोरगी ग्रामस्थांकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे.
त्या दोघींना पुढील शिक्षणासाठी चांगल्या शासकीय इंजिनियरींग व मेडीकल कॅालेजला प्रवेश मिळेल. आपल्या गावातील या दोन्ही कन्या नावाजलेल्या शासकीय काॅलेज मधुन इंजिनियर व डॅाक्टर बनतील. अशी आशा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.