गावगाथा

*ग्रामपंचायत परिवाराने घटासाठी दिले घरोघरी धान्य ;चपळगांव व बावकरवाडी ग्रामपंचायतीचा उपक्रम..*

नवरात्र विशेष

*ग्रामपंचायत परिवाराने घटासाठी दिले घरोघरी धान्य ;चपळगांव व बावकरवाडी ग्रामपंचायतीचा उपक्रम..*
=====================
चपळगांव प्रतिनिधी- घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर प्रत्येकाच्या घरी देवीचा घाट घालतात.या घटामध्ये रब्बी हंगामातील धान्य पेरतात.हे धान्य मिळविताना महिलांना कसरत करावी लागते.परंतु अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव-बावकरवाडी ग्रामपंचायत परिवाराने घटस्थापनेच्या पुर्वसंध्येला हजारो कुटुंबांना सात प्रकारच्या धान्यांचे पाकीट घरपोच करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
यासंदर्भात सरपंच वर्षा भंडारकवठे,उपसरपंच सुवर्णा कोळी,ग्रामसेवक विनोद डावरे,माजी सरपंच उमेश पाटील,ग्रामपंचायत सदस्य रेशमा तांबोळी,वंदना कांबळे,गौराबाई अचलेरे,मल्लिनाथ सोनार,स्वामीनाथ जाधव,चित्रकला कांबळे,गंगाबाई वाले आदींनी एकत्रित येत विचारविनीमय करुन हा निर्णय घेतला.हिंदु धर्मसंस्कृतीमध्ये नवरात्र महोत्सवास खुप मोठे स्थान आहे.तसेच यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे प्रत्येक कुटुंबाला छोटासा हातभार लावण्यासाठी हा प्रयत्न केला असल्याचे संयोजकांनी सांगितले.
उपक्रमाच्या यशस्वितेसाठी उमेद महिला बचत गटाच्या आयसीआरपी कावेरी निंगदळे,लिपीक उमेश सोनार,कर्मचारी पांडुरंग चव्हाण,विष्णुवर्धन कांबळे, सिध्दाराम हणमशेट्टी,यमुनाबाई गजधाने,रविकांत कोरे,अमोल गजधाने,मिनाज पटेल,आकाश बिराजदार आदींनी परिश्रम घेतले.
चौकट..
सात प्रकारच्या धान्यांचे किट..
देवीच्या घटामध्ये रब्बी हंगामातील धान्य घालतात.ग्रामपंचायत परिवाराने घटासाठी गहु,ज्वारी,जवस,जोड,करडई, हरभरा,अंबाडी अशा सात प्रकारच्या धान्यांचे किट दिले.यामुळे चपळगाव व बावकरवाडी गावातील हजारो महिलांचे वेळ,कष्ट वाचण्यास मदत झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button