विठू माऊलीच्या नामाचा जयघोष करत वंडर स्कूलचा ‘ विज्ञान दिंडी सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा.
आषाढ पालखी सोहळा विशेष

विठू माऊलीच्या नामाचा जयघोष करत वंडर स्कूलचा ‘ विज्ञान दिंडी सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा.

पुणे प्रतिनिधी: अमोल धडके

कात्रज गोकुळ नगर येथील वंडर स्कूलमध्ये भक्तीचा वारसा जपत चिमुकल्यांनी विठ्ठल-रुक्मिणी ,ज्ञानदेव, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाईची वेशभूषा करून टाळ, चिपळ्या,मृदंग आणि विठू माऊलीच्या हरिनामाचा जयघोष करत ‘विज्ञान दिंडी’ हा सोहळा मोठ्या उत्साहाने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
वंडर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकाचवेळी रक्माई,विठ्ठल विठ्ठला,माऊली माऊली,या गाण्यावर सामूहिक नृत्य सादर करून नेत्रदीपक रिंगण करून
माऊली माऊलीच्या ठेक्यावर सर्व विद्यार्थी, शिक्षकांनी फुगड्या घातल्या.या दिंडीचे आयोजन सत्कर्म शिक्षण व संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व स्कूल कॉरडीनेटर हेमा शितोळे यांच्या उपस्थितीत पार पडला.

वंडर स्कूल, गोकुळनगर (शाखा क्र. ४ ) प्रती वर्षी नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवीत असते. वंडर स्कूल, गोकुळनगर शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासूनच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० याप्रमाणे अंतर्भूत अभ्यासक्रम राबवीत आहे. याच प्रयोगातून हस्त-खेळत शिक्षण याचा अंतर्भाव केलेला आहे. वंडर स्कूल, गोकुळनगरचे खास वैशिष्ट्य म्हणजे शालेय उपक्रमामधील पालकांचा सहभाग. वंडर स्कूल गोकुळनगर, चालू होवून केवळ ३ वर्षेच झालीत, पण परिसरातील पालकांचा शाळेतिल प्रवेशासाठी अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद आहे. संस्थेचे मार्गदर्शक डॉ सतीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्कूल कॉर्डीनेटर हेमा शितोळे व शिक्षकवृंद अत्यंत प्रभावीपणे केंद्रीय अभ्यासक्रम शिकवत आहेत. प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही आषाढी एकादशी निमित्त शाळेतिल मुलांना आपल्या परंपराची माहिती व्हावी यासाठी गोकुळनगर लेन नं. ३ व ४ मधून दिंडी काढण्यात आली. मुलांनी भक्ती-शक्ती व युक्ती याचा संगम म्हणजेच विज्ञान या विषयावर विज्ञान दिंडी काढली. या दिंडीच्या सफलतेसाठी विद्यार्थ्याच्या पालकांनी ही खूप परिश्रम घेतले. या दिंडीचा वेगळा विषय व सादरीकरण याचे परिसरातील नागरिकांनी अत्यंत मनापासून व भरभरून कौतुक केले. या दिंडी सोहळ्यात लायन्स क्लब पुणे, कात्रज व गोकुळनगर जेष्ठ नागरिक संघ यांचा सहभाग या दिंडी साठी लाभला.

विविध नाविन्यपूर्ण शालेय उपक्रमासाठी वंडर स्कूल – संतोषनगर, महादेवनगर, अंजनीनगर व गोकुळनगर यांची ओळख आहे. अनेक सामजिक कार्यक्रमामध्ये सुद्धा वंडर स्कूल पुढाकार घेत असते. पालकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे व समाजातील विविध घटकांच्या सक्रीय पाठिंब्यामुळे वंडर स्कूलची शैक्षणिक आगेकूच चालू आहे.या दिंडी सोहळ्यात स्कूलचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
