स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

स्वामी चरणी साकडे घातल्यानेच उपमहाराष्ट्र केसरी पदाचा मानकरी – पै.समाधान पाटील

उपमहाराष्ट्र केसरी पै.समाधान पाटील

स्वामी चरणी साकडे घातल्यानेच उपमहाराष्ट्र केसरी पदाचा मानकरी – पै.समाधान पाटील

HTML img Tag Simply Easy Learning    

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२२/१२/२२) – बालपणापासून कुस्ती या क्रीडा प्रकाराची आपल्याला अत्यंत आवड आहे. त्यामुळे विविध ठिकाणी भरविल्या जाणाऱ्या कुस्ती स्पर्धांमध्ये सहभागी होत कुस्तीपटू म्हणून माझे व्यक्तिमत्व नावाला आले. याच प्रसिद्धी झोतात व स्वतच्या इच्छाशक्तीने मला महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत कुस्तीतील कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. स्वामी समर्थांचा मी निश्चित भक्त असल्याने स्वामी समर्थांचे आशीर्वाद तर पाठीशी आहेतच व कौशल्य पणाच्या व प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर गतकाळात उपमहाराष्ट्र केसरी पदाचा मानकरी होण्याचे भाग्य आपणास लाभले असल्याचे मनोगत उपमहाराष्ट्र केसरी पै.समाधान पाटील यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर बोलत होते. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी पै.समाधान पाटील, पैलवान बापू सोंडगे, पैलवान रामा पुजारी, धरती बनसोडे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, चंद्रकांत सोनटक्के, संतोष जाधव-फुटाणे, संजय पवार इत्यादी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – पै.समाधान पाटील व सहकाऱ्यांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button