
राष्ट्रीय परिसंवादासाठी बसव अभ्यासक शिवानंद गोगाव यांची निवड


वागदरी
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी कन्नड शाळेचे उपक्रमशील शिक्षक, सोलापूर जिल्हा जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष शरण शिवानंद गोगाव यांची विश्व बसव धर्म ट्रस्ट अनुभव मंडप बसवकल्याण येथे आयोजित ‘शिवयोगी सिद्धराम सांस्कृतिक मुखामुखी’ दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादास निवड झाली आहे.
6 आणि 7 जुलै 2024 रोजी बसवकल्याण येथील नवीन अनुभव मंडपम येथे होणाऱ्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादात शिवानंद गोगाव यांनी ‘शिवयोगी सिद्धरामाचे यात्रा आणि उत्सव’ या विषयावर लिहिलेल्या लेखाची निवड करण्यात आली असून, इथे या विषय मांडण्यासाठी त्यांना आमंत्रित केले आहे.
या राष्ट्रीय परिसंवादात कर्नाटक, महाराष्ट्र आणि देशाच्या विविध भागातून तज्ज्ञ येऊन आपले विचार मांडणार आहेत हे परिसंवाद शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या बद्दल असलेले हे विशेष.
विश्वबसव धर्म ट्रस्ट अनुभव मंटपाचे अध्यक्ष भालकीचे डॉ. बसवलिंगपट्टदेवरु यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली, शरणबसवेश्वर विद्यापीठाच्या कन्नड अभ्यास संस्थेचे प्रमुख कल्याणराव पाटील यांच्या योजनेतुन होणाऱ्या या राष्ट्रीय परिसंवादात कर्नाटकातील विविध धर्मगुरू सहभागी होणार आहेत.
शिवानंद गोगवा हे गेल्या २० वर्षांपासून सोलापूर सीमावर्ती भागात शरण साहित्याचा प्रचार करत असून, कर्नाटकातील विजय कर्नाटक या सुप्रसिद्ध कन्नड वर्तमानपत्रातून शिवयोगी सिद्ध रामेश्वरांचे वचन तत्त्व सिद्धांत प्रसार व प्रचार करण्यामध्ये विशेष पुरवणी काढण्या मधे त्यांचें यांचे मोठा योगदान आहे. या निवडीसाठी जागतिक लिंगायत महासभा सोलापूर जिल्ह्याचे सर्व सदस्य, शिक्षक परिवाराचे सदस्य, सहित अनेक मान्यवर त्यांचे अभिनंदन केले आहे.

यावर शिवानंद गोगाव म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या मेहनतीमुळे ही संधी मिळाली आहे, बसव कल्याणवरील या राष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी होणे हे आपले भाग्य आहे.
