
दिवंगत रमाकांत मयेकर यांच्या स्मृती निमित्त किराणा वाटप…

मुंबई प्रतिनिधी
गणेश हिरवे


मुंबईतील सेंट टेरेसा शाळेतील शिक्षिका सुधा सुर्वे यांनी नुकतेच त्यांच्या दिवंगत वडिल रमाकांत मयेकर यांच्ये स्मृती प्रित्यर्थ जोगेश्वरी येथे २५ दृष्टीहीन लोकांना किराणा वाटप केले. आपल्या मिळकतीच्या काही वाटा हा गोर गरीब वंचित लोकांना सहकार्यासाठी द्यायला हवा व याच उद्देशाने आम्ही वर्षातून अनेकवेळा यासाठी पुढाकार घेत असल्याचे सुर्वे कुटुंबीयांनी सांगितले. विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून सुधा सुर्वे ओळखल्या जातात.असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कायमच आम्हाला समाजसेवक गणेश हिरवे सरांची मदत होत असून वेळात वेळ काढून ते देखील कार्यक्रमात उपस्थित राहतात हे विशेष असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढाकार घेत आहोत.किराणा वाटण्यासाठी सुधा यांचे पती सुनील सुर्वे आणि पुत्र उन्मेष, ईशा नाईक, माजी सैनिक चंद्रशेखर सावंत हे आवर्जून उपस्थित होते.उन्मेष सुर्वे यांनी आज त्याच्या आजोबांच्या स्मृतीनिमित्त रक्तदान देखील केलं.
