गुरुपोर्णिमा व मोहरम चे औचित्य साधून भाजपा नेते रमेश सिद्रामप्पा पाटील यांचे शहरातील प्रमुख मार्गावर शुभेच्छाचे फलक लागल्याने राजकीय क्षेत्रात चर्चा
चर्चेतील व्यक्ती

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्रीक्षेत्र अक्कलकोटात गुरुपोर्णिमा व मोहरम चे औचित्य साधून भाजपा नेते रमेश सिद्रामप्पा पाटील यांचे शहरातील प्रमुख मार्गावर शुभेच्छाचे फलक लागल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.*


अभी नही तो कभी नही, या भाजपातील अंतर्गत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीवरून सध्या मतदार संघात जोरदार चर्चा रंगू लागल्या असून, तालुक्याचे माजी आमदार सहकार नेते सिद्रामप्पा पाटील यांचे पुत्र रमेश सिद्रामप्पा पाटील यांनी भाजपा कडून उमेदवारी मागण्याचा चंग बांधल्याने त्याप्रमाणे आखणी केली जात आहे.

या आठवड्यात गुरुपोर्णिमा व मोहरम असून, या निमित्त रमेश पाटील यांचे शहरातील प्रमुख मार्गावर शुभेच्छाचे फलक झळकू लागल्या आहेत. या फलकावर त्यांनी स्वामी भक्तांचे स्वागत व शुभेच्छा दिलेल्या असून, यासह नूतन आमदार पंकजा मुंढे यांच्या अभिनंदनाचे फलक देखील लावण्यात आले आहे.


सदर फलकावर भाजपाचे जेष्ठ नेते स्व.प्रमोद महाजन, स्व.गोपीनाथ मुंढे, राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या छायाचित्रा बरोबरच कमळ चिन्ह घेण्यात आले आहे. रमेश पाटील यांच्या करिता व विद्यमान यांच्यासाठी कार्यरत असलेले एम कुटुंबातील पिता पुत्राची चर्चा ही रंगू लागली आहे. या दोन्ही घटनेमुळे राजकीय वातावर ढवळून निघत आहे.