गावगाथा
वागदरी परिसरात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान – पंचनाम्यासाठी ग्रामपंचायतीची मागणी
निवेदन

वागदरी परिसरात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान – पंचनाम्यासाठी ग्रामपंचायतीची मागणी
वागदरी —गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील वागदरी मंडळातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात वागदरी ग्रामपंचायतीतर्फे तहसीलदार अक्कलकोट यांना नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.
सरपंच शिवानंद परमेश्वर घोळसंगाव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली गेली असून उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाकडून तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य तो आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली आहे.
