अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे आयुष्मान भव आरोग्य सेवा मेळाव्याचे आयोजन
व्याधीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आयुष्मान भव या अभियानांतर्गत अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाने विविध रोगांची तपासणी उपचार व शस्त्रक्रिया करून आयुष्मान भारत आरोग्य कार्ड ची नोंदणी वितरित करून आरोग्य संपदा करीत असल्याचे गौरवउद्गार सामाजिक कार्यकर्ते अरविंद पाटील

अक्कलकोट:-( प्रतिनिधी) व्याधीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आयुष्मान भव या अभियानांतर्गत अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाने विविध रोगांची तपासणी उपचार व शस्त्रक्रिया करून आयुष्मान भारत आरोग्य कार्ड ची नोंदणी वितरित करून आरोग्य संपदा करीत असल्याचे गौरवउद्गार सामाजिक कार्यकर्ते अरविंद पाटील यांनी केले.
ते अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे आयुष्मान भव आरोग्य सेवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी समाजसेवक पाटील बोलत होते.
याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. अशोक राठोड, डॉ रवींद्र बनसोडे, डॉ. निखिल क्षीरसागर, श्रीमती शबाना तारानाईक, डॉ. सतीश बिराजदार, डॉ. सुलतानपुरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी गरोदर माता तपासणी 18 वर्षाच्या आतील मुलांची तपासणी वयोवृद्धांचे रक्तदाब व मधुमेह ईसीजी मोतीबिंदूंची तपासणी करण्यात आले यामध्ये 25 मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांना पुणे येथे शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले या दिनी दिवसभर 362 रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आली. प्रसंगी आयुष्यमान भव आरोग्यसेवा कार्ड ही काहींना वितरित करून उपस्थितांना अवयव दान व रक्तदानाचे महत्त्व पटवून देऊन दान करण्याचे आव्हान ही करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष बसवराज अळोळी, सपोनी सत्तार शेख, डॉ. सुलतानपुरे डॉ. सतीश बिराजदार, श्रीमती सुरेखा वर्दे, प्रमिला वाघमारे, मनीषा वर्दे, मंजुश्री मुळे, उज्वला फडतरे, धनश्री सोनवणे, अंजली राठोड, आदी कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
