जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत सुप्रिया देसाई प्रथम; सोलापूर जिल्ह्याचा गौरव
वळसंग :सोलापूर जिल्हा कला अध्यापक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत सुप्रिया राजू देसाई हिने सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे वळसंग गावासह शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुप्रिया ही वळसंग येथील शंकर लिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत इयत्ता नववीत शिक्षण घेत असून, लहान वयातच तिने चित्रकलेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यापूर्वीही तिने विविध जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धांमध्ये यश संपादन करून अनेक बक्षिसे मिळविली आहेत. सातत्य, मेहनत आणि कलात्मक दृष्टिकोनाच्या जोरावर तिने हे यश प्राप्त केले असल्याचे तिच्या शिक्षकांकडून सांगण्यात आले.
या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य श्री. वीरेश थंळगे यांनी सुप्रियाचे विशेष कौतुक केले. तसेच शिक्षकवर्ग, शिक्षणप्रेमी, पालक व ग्रामस्थांनी तिच्या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सुप्रियाच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही कला क्षेत्रात मोठी संधी असल्याचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!