गावगाथा

आकाशवाणीचा आज ‘ सुंदर मी होणार ‘ हा कार्यक्रम विविध सौंदर्य स्पर्धेतील विजेत्यांचाही होणार गौरव

गौरव पुरस्कार

आकाशवाणीचा आज ‘ सुंदर मी होणार ‘ हा कार्यक्रम
विविध सौंदर्य स्पर्धेतील विजेत्यांचाही होणार गौरव
सोलापूर ( दिनांक २७ ) आकाशवाणी सोलापूर केंद्र आणि स्त्री त्वचारोग तज्ञ संघटना, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ मिशन ब्युटी- सुंदर मी होणार ‘ या कार्यक्रमाचे आयोजन उद्या दुपारी दोन वाजता सोलापूरातल्या हुतात्मा स्मृती मंदिरात केले आहे. प्रारंभी ‘ प्रश्न तुमचे उत्तर त्वचारोग तज्ञांचे’
हा कार्यक्रम होईल. यात उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना सौंदर्यतज्ञ व त्वचारोग तज्ञ डॉ स्मिता चाकोते,डॉ.तृप्ती खटावकर,डॉ.कांचन उकरंडे,डॉ. श्रुती मठ,डॉ. वैशाली म्हसवेकर,डॉ. मिताली मोरे,डॉ. राजश्री वाघचौरे, डॉ.मानसा बोल्ली उत्तरे देतील. लक्षवेधी विशेष प्रश्न विचारलेल्या विजेत्या प्रश्नकर्त्याला आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहे. त्यानंतर सोलापूरातील त्वचारोग तज्ञ व सौंदर्य तज्ञ डॉ. स्मिता चाकोते यांचे ‘निरामय सौंदर्याचे रहस्य’ या विषयावर मार्गदर्शन होईल.
आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या वतीने दर सोमवारी प्रसारित होणाऱ्या सुंदर मी होणार या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिलेल्या विजेत्या स्पर्धकांचा गौरव होईल. तसेच स्त्री त्वचारोग तज्ञ संघटनेमार्फत घेण्यात आलेल्या सुंदर व निरोगी त्वचा, सुंदर व आकर्षक केस आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्व या तीन स्पर्धांतील विजेत्यांचाही गौरव होणार आहे.
या कार्यक्रमासाठी उपजिल्हाधिकारी मा. मनीषा कुंभार, आकाशवाणी सोलापूर केंद्राचे प्रसारण अधिकारी सुजित बनसोडे, अभियंता दिलीप मिसाळ,त्वचारोगतज्ञ व सौंदर्यतज्ञ डॉ.स्मिता चाकोते यांच्यासह सोलापुरातील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ.नरेंद्र जोशी,डॉ. गिरीश काळे,डॉ. स्वप्नील शहा आणि डॉ. सचिन कोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला आहे. जास्तीत जास्त सोलापूरकरांनी यात सहभागी व्हावे. असे आवाहन आकाशवाणी सोलापूर आणि स्त्री त्वचारोग संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button