महादेव कोगनुरे यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून सोलापूर सिध्दारामेश्वर व रूपाभवानी देविला साकडे.
महादेव कोगनुरे यांना जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून देवाकडे प्रार्थना.

महादेव कोगनुरे यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून सोलापूर सिध्दारामेश्वर व रूपाभवानी देविला साकडे.

महादेव कोगनुरे यांना जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून देवाकडे प्रार्थना.


——

सोलापूर जिल्ह्य़ात सध्या प्रत्येक पक्षातील नेत्यांनी विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून आपापल्या गाॅड फादरकडे फिल्डिंग लावताना दिसून येत आहेत, तर काही नेत्यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी स्वत: कार्यकर्ते देव पाण्यात ठेवून बसले आहेत.त्यातच आता दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून एक के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर काँग्रेस नेते महादेव कोगनुरे यांना उमेदवारी मिळावी म्हणून असंख्य कार्यकर्त्यांनी आज सोलापूर येथील सिध्दारामेश्वरच्या मंदिरात तर शुक्रवार देवीचा वार असल्याने रूपाभवानी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या नेत्याला उमेदवारी मिळावी म्हणून साकडे घालून प्रार्थना केली. यापुढे आता दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यामध्ये जोरदार रस्सीखेच पहायला मिळणार आहे. कारण सध्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या अधिक आहे.अनेक नेते सध्या उमेदवारी मिळवण्यासाठी गाठी-भेटीवर जोर देत धडपड करताना दिसून येत आहेत. त्यातच आता महादेव कोगनुरे यांना दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून स्वत: कार्यकर्ते सिद्धारामेश्वर व देवीच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करत असल्याने आता पक्ष नेतृत्वाला ही उमेदवारी कोणाला द्यावी याचा प्रश्न पडला आहे. सध्या तरी यामुळे एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना कार्यकर्त्यांचा वाढता प्रतिसाद पहायला मिळत आहे. यापूर्वी ही केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,नुतन खासदार प्रणितीताई शिंदे तसेच काॅग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांनी निवेदन सादर करुन महादेव कोगनुरे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती.आज पुन्हा एकदा कार्यकर्ते एकत्रित येत महादेव कोगनुरे यांना उमेदवारी मिळावी म्हणून श्री सिद्धारामेश्वर च्या चरणी नतमस्तक होताना दिसून आले. यावेळी शिवशरण मुलगे, रविकांत चांदोडे, मल्लेशी मंडोली, रविकांत पाटील, किरण राठोड, हणमंत दिंडूरे, काशिम शेख, नागेश कोळी, ओंकार स्वामी, लक्ष्मीकांत बगले, आंबदास पाटील इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महादेव कोगनुरे यांच्यावर प्रेम करणारे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट
जनसेवेची वसा घेऊन निस्वार्थपणे जनतेची सेवा करणारे महादेव कोगनुरे यांना दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून आज आम्ही सर्व कार्यकर्ते सिद्धारामेश्वर च्या चरणी नतमस्तक होऊन मागणी केली.–
शरणू मुलगे सोलापूर
फोटो ओळ
महादेव कोगनुरे यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून सोलापूर येथील सिध्दारामेश्वर च्या मंदिरात नतमस्तक होऊन देवाकडे मागणी करताना असंख्य कार्यकर्ते