गावगाथाठळक बातम्या
Sarpanch: ब्रेकिंग ; सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ
मुंबई (प्रतिनिधी): सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. त्याचबरोबर ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी या पदांबाबतही महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाजन यांनी सांगितलं की, “राज्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट करण्यात आलं आहे. तसंच आता ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदं विलीन करुन हे एकच पद करण्यात आलं आहे. तसंच ज्या ग्रामपंचायतींचं वार्षिक उत्पन्न ७५ हजार आहे, त्यांना १० लाखांपर्यंत निधीची वाढ करण्यात आली आहे. तसंच ग्रामीण गृहनिर्माण योजनेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात २० टक्के वाढ करण्यात आली आहे”
