
चपळगाव प्रशालेत शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न!

चपळगाव,
केंद्र शासन व राज्य शासन पुरस्कृत, शिक्षण सप्ताहाचे सातवे दिवस

*समुदाय सहभाग दिवस*
ग्रामीण विद्या विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चपळगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
प्रथम विध्यार्थ्यांची गावातून जागृती फेरी काढण्यात आली.
स्वच्छता,पर्यावरण,शिक्षण,
इत्यादी विषयावर संदेश-फलकासह विध्यार्थ्यांनी घोषणा दिल्या.
# या शिक्षण सप्ताहातील 7 दिवस विविध उपक्रमात NCC प्रमुख भंगे सर व 9 महाराष्ट्र बटालियन,NCC विद्यार्थ्यांचे विशेष सहभाग होता.
# विदयान्जली पोर्टल चे रेजिस्ट्रेशन करून स्वयंसेवकांची निवड करण्यात आली.

# तदनंतर विदयान्जली कार्यक्रमअंतर्गत शिक्षक- विध्यार्थी सभा घेण्यात आली. या सभेत प्राचार्य माने सर, CEO नीलकंठ पाटील सर, विजापूरे सर,दुलंगे सर यांनी शिक्षण कार्यात *समुदाय सहभागबद्दल*
उदबोधन केले.

विध्यार्थी ओमकार राजेगावकर याने शिक्षण सप्ताहातील आपले अनुभव सांगितले.

# शाळेसाठी उदारवृत्तीने सहकार्य करणारे दानशूर व्यक्तींचे *नामफलकाचे* सर्व गुरुजनांच्या उपस्थित अनावरण करण्यात आले.
# शाळा स्वयंसेवकांना *कृतज्ञता पत्र* देऊन सन्मान करण्यात आले.
अशारीतीने उत्साहपूर्ण वातावरणात एक नवीन अनुभवासह शिक्षण सप्ताहची सांगता करण्यात आली.