प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून भक्ताभिमुख कार्य होत असल्याचे मनोगत इन्स्टाग्राम फेम अनिकेत शिंदे,
प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला,

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून भक्ताभिमुख कार्य होत असल्याचे मनोगत इन्स्टाग्राम फेम अनिकेत शिंदे, इचलकरंजी यांनी व्यक्त केले.

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता, मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

यावेळी न्यासाचे विश्वस्त संतोष भोसले, मनोज निकम, मैनुद्दीन कोरबू, निखील पाटील, एस.के.स्वामी, बाळासाहेब घाडगे, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, कल्याण देशमुख, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, मल्लिनाथ कोगणुरे, शावरेप्पा माणकोजी, शिवकुमार स्वामी, विजय माने, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, चंद्रकांत हिबारे, काशिनाथ वाले यांच्यासह न्यासाचे सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
