अक्कलकोट श्रावण मासानिमित्त वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम
श्रावण मासानिमित्त 2024
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/08/IMG-20240803-WA0033-558x470.jpg)
श्रावण मासानिमित्त वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
(श्रीशैल गवंडी, दि.३/८/२४. अक्कलकोट)
यंदाच्या श्रावणमासा निमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.
श्रावणमासा निमित्त सोमवार दिनांक ५ ऑगस्ट २०२४ ते रविवार दिनांक ११ ऑगस्ट २०२४ अखेर अंबड, जिल्हा-जालना येथील ह.भ.प.श्रीहरी महाराज रसाळ यांच्या श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या सप्ताहात सोमवार दिनांक १२ ऑगस्ट ते रविवार दिनांक १८ ऑगस्ट अखेर बोरगाव येथील ह.भ.प. भागवताचार्य महादेव महाराज पाटील-काळे यांच्या वाणीतून भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक २० ऑगस्ट ते मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट अखेर ह.भ.प. योगीराज महाराज प्रकाश गोंदीकर (श्री क्षेत्र गोंदी) जि.जालना यांचे गोकुळ अष्टमी व गोपाळकाल्या निमित्त कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. या कीर्तन सेवेत लातूर जिल्ह्यातील चिकुर्डा येथील श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाची साथ संगत लाभणार आहे. बुधवार दिनांक २८ ऑगस्ट ते मंगळवार दिनांक ३ सप्टेंबर अखेर चौथ्या सप्ताहात आळंदी देवाची येथील भागवताचार्य ह.भ.प.विजय महाराज पांचाळ यांची भागवत कथासार सेवा आयोजित करण्यात आली आहे.
सदर वरील सर्व कार्यक्रम श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत संपन्न होतील, तरी श्रावण मासानिमित्त वरील प्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या आध्यात्मिक कथा कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
(चौकट —– श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात नित्यनियमाने होणारी सकाळी ११:३० वाजताची श्री.स्वामी समर्थांची नैवेद्य आरती श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी सकाळी ११:३० वाजता न होता सायंकाळी ५:३० वाजता नैवेद्य आरती होईल व त्यानंतर उपस्थित भाविकांना देवस्थान कडून प्रसाद वाटप करण्यात येईल. यानंतर श्रावण सोमवारी रात्रीची शेजारती होणार नाही याची सर्व स्वामी भक्तांनी नोंद घ्यावी.)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)