वटवृक्ष मंदीरात मुंबईच्या श्री.स्वामी समर्थ भक्त परिवारची भजनसेवा संपन्न
वटवृक्ष मंदीरात ज्योतीबा मंडपात भजनसेवा सादर करताना श्री. स्वामी समर्थ भक्त परिवारचे सदस्य दिसत आहेत.

वटवृक्ष मंदीरात मुंबईच्या श्री.स्वामी समर्थ भक्त परिवारची भजनसेवा संपन्न

(श्रीशैल गवंडी, अ.कोट.दि.२६ /०१/२०२५)
येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात मुंबईच्या श्री.स्वामी समर्थ भक्त परिवारची भजनसेवा मोठया भक्तीभावात संपन्न झाली. या भजन सेवेत गायक कृष्णा चौकेकर, राजेश सावंत, दिनेश साळवी, मंदार सावंत, अनिल कोळवणकर यांच्यासह स्वामी समर्थ भक्त परिवारच्या कलाकारांची भजन सेवा स्वामी चरणी समर्पित झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांचा सत्कार मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते स्वामींचे कृपावस्त्र देऊन संपन्न झाला. या भजन सेवेत श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाच्या सर्व कलाकारांनी स्वामींचे नामस्मरण, राम गणपती वंदन, श्रीपाद श्रीवल्लभ भजन, स्वामी स्तुती, शंकर महाराज स्तवन, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, निघालो घेऊन दत्ताची पालखी इत्यादीसह अनेक भावगीते गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, सागर गोंडाळ, रविराव महींद्रकर, काशिनाथ इंडे, श्रीकांत मलवे, विपूल जाधव, प्रसाद सोनार आदीसह भाविक भक्तांनी या भजन सेवा श्रवणाचा लाभ घेतला.

फोटो ओळ – वटवृक्ष मंदीरात ज्योतीबा मंडपात भजनसेवा सादर करताना श्री. स्वामी समर्थ भक्त परिवारचे सदस्य दिसत आहेत.
