गावगाथाठळक बातम्या

Akkalkot : अष्टपैलू क्रिकेटपटू केदार जाधव यांनी घेतला अक्कलकोट वटवृक्ष स्वामी मंदिराचे दर्शन

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट (प्रतिनिधी ): श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यास करीत असलेले विविध विकास कार्य हे उत्कृष्ट असल्याचे मनोगत आर.सि.बी. आणि आयपीएल हैद्राबाद क्रिकेट टीमचे केदार जाधव यांनी व्यक्त केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता पुरोहित संजय कुलकर्णी यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत श्रीक्षेत्र अक्कलकोटचे क्रिकेटपटू सत्यजित दत्तात्रय जाधव हे उपस्थित होते. 

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी महेश शिर्के व न्यासाचे एस.के.स्वामी, शहाजीबापू यादव, कल्याण देशमुख, सतीश महिंद्रकर, मल्लिनाथ कोगणुरे, शावरेप्पा माणकोजी, शिवकुमार स्वामी, महांतेश स्वामी, काशिनाथ वाले, विश्वनाथ कलशेट्टी, खंडेराव होटकर, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button