अन्नछत्र मंडळ हे अखंड गतीतून सार्थकता असल्याचे मनोगत ; दक्षिण मद्य मुंबईचे विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर
दक्षिण मद्य मुंबईचे विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले अन्नछत्र मंडळ हे अखंड गतीतून सार्थकता असल्याचे मनोगत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते व दक्षिण मद्य मुंबईचे विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर यांनी व्यक्त केले.*

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटूंब आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख आनंद बुक्कानवर व न्यासाचे सचिव शामराव मोरे, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, धानू उमदी, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, निखिल पाटील, गोटू माने, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, शरद भोसले, चंद्रकांत हिबारे, संभाजीराव पवार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
