श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले वतीने नव्याने उभारत असलेल्या ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर बांधकामास रु. ५ लाखांची देणगी..
न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते मंगळवारी अन्नछत्र मंडळाच्या अतिथी कक्षात मंदिर समितीस देण्यात आला.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले वतीने नव्याने उभारत असलेल्या ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर बांधकामास रु. ५ लाखांची देणगी..
अक्कलकोट दि. १३ (प्रतिनिधी)

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी श्रावण मासाचे औचित्य साधून नव्याने उभारत असलेल्या ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर बांधकामास जाहीर केलेल्या रु. ५ लाखाच्या देणगीचा धनादेश न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते मंगळवारी अन्नछत्र मंडळाच्या अतिथी कक्षात मंदिर समितीस देण्यात आला.

यावेळी श्री मल्लिकार्जुन मंदिर समितीचे प्रशांत लोकापुरे, स्वामिनाथ हिप्परगी, सुनील गोरे, बसवराज माशाळे, अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे काका, प्रा. आडवीतोटे, विजकुमार कापसे, शिवराज स्वामी, राजु नागुरे, सिद्धराम कवटगी यांच्यासह न्यासाचे विश्वस्त संतोष भोसले, मनोज निकम, आतिश पवार, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, बाळासाहेब पोळ, महांतेश स्वामी, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी उपस्थित होते.
