वागदरी जि.प.शाळेत नव्याने रुजू झालेले मुख्याध्यापक बाबासाहेब बनसोडे यांचं शिवलिंग आसुदे मित्र परिवारा तर्फे सत्कार…
सत्कार सन्मान

वागदरी जि.प.शाळेत नव्याने रुजू झालेले मुख्याध्यापक बाबासाहेब बनसोडे यांचं शिवलिंग आसुदे मित्र परिवारा तर्फे सत्कार…

वागदरी — अतिशय हुशार आणि प्रामाणिक नियमानुसार काम करणारे व कष्टातुन सावरत आदर्श जीवन जगणारे आदर्श शिक्षक सुरुवातीला औरंगाबाद जिल्ह्यातून शिक्षक या पदाचा पद स्वीकारले त्या ठिकाणी त्यांच्या हाताखाली शिकलेले विध्यार्थी विविध पदावर रुजु झाले.नंतर अक्कलकोट तालुक्यात बोरोटी जि.प. मराठी शाळेत शिक्षक म्हणून काम पाहत होते बोरोटी गावातून पदोन्नती बदली म्हणून आपल्या जिल्हा परिषद मराठी मुलींचा शाळा वागदरी गावात मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे वागदरी गावात नुकताच मुख्याध्यापक म्हणून आलेले बाबासाहेब बनसोडे सरांचे सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आले.
यावेळी महादेव सोनकवडे माजी जि.प.शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवलिंग ल.आसुदे यांच्याकडून बाबासाहेब श.बनसोडे मुख्याध्यापक यांना शाल ,फेटा ,हार आणि गुच्छ देऊन करण्यात आले .या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत इंडे ,अशोक ख्याले ,आकाश आष्टे , दिलीप नडगेरी, श्याम बाबर सहशिक्षिका गिरी मॅडम व इतर शिक्षकवर्ग उपस्थित होते
