गावगाथा

सामर्थ्य आणि शक्तीचा योग्य वापर करण्याचा बोध स्वामी समर्थांनी दिला – आमदार प्रवीण स्वामी

आमदार प्रवीण स्वामी यांचा सपत्नीक देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, सुनील कटारे व अन्य दिसत आहेत.

सामर्थ्य आणि शक्तीचा योग्य वापर करण्याचा बोध स्वामी समर्थांनी दिला – आमदार प्रवीण स्वामी

HTML img Tag Simply Easy Learning    

(श्रीशैल गवंडी-अक्कलकोट) दि.५/१/२५) – श्री स्वामी समर्थाच्या अनेक लीला आहेत आणि यातून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. स्वामींनी आपल्या अलौकिक चमत्कारातून व प्रचितीतून प्रत्येकाला शिकवण दिली आहे असे आपण म्हणू शकतो. श्री स्वामी समर्थ पाठीशी असल्याने अनेक गोष्टीतून आपल्याला स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती आलेली आहे, म्हणून असे बोलावेसे वाटते की माझ्या सारख्या अनेक स्वामी भक्तांना स्वामींची प्रचिती आपल्यासाठी प्रेरक ठरते. याचा अनुभव भाविकांनी स्वामींच्या नामस्मरणातून घ्यावा. स्वामींच्या प्रचितीची अघाद महिमा आजवर अनेक वेळा अनुभवण्यास आलेले आहे. स्वामी समर्थांची अफाट भक्ती माझ्याकडे असल्याने स्वामींच्या कृपेने आपण राजकीय क्षेत्रात अनेक विकासात्मक कामे करत केव्हा नावारूपास आलो कळलेच नाही. हे सामर्थ्य व ही शक्ती आपल्या अंगी असल्याची जाणीव स्वामी कृपेने झाली आहे. या अनुषंगाने अंगी असलेल्या सामर्थ्य व शक्तीचा योग्य वापर करण्याचा बोध स्वामीभक्तीतूनच मिळाल्याचे मनोगत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी
आमदार प्रवीण स्वामी यांचा सपत्निक स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी आमदार प्रवीण स्वामी बोलत होते. यावेळी मंदिर समितीचे मंदार महाराज पुजारी, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी, सुनिल कटारे, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपूल जाधव, संजय पवार, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ इत्यादी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – आमदार प्रवीण स्वामी यांचा सपत्नीक देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, सुनील कटारे व अन्य दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button