गावगाथाठळक बातम्या

Solapur: तीर्थ येथील श्री रामलिंगेश्वर शिक्षण संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

HTML img Tag Simply Easy Learning    

तीर्थ(ता.द.सोलापूर) : श्री रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण संस्थेचे खजिनदार काशिनाथ बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी २६ विद्यार्थ्यांनी इंग्रजी, हिंदी, मराठी व कन्नड भाषेत अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त करुन पालकांची दाद मिळविली.पालकांनी विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देऊन सन्मान केला.विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यिनी कु.सोनाली. बिराजदार हिची राज्य पोलिस दलात निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. भीमाशंकर बिराजदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी मार्गदर्शन करताना काशिनाथ बिराजदार म्हणाले की,शिक्षण संस्थेतील शिस्त,विद्यार्थ्यांची वागणूक पाहून खूप आनंद वाटला.शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांना धन्यवाद देतो. विद्यार्थ्यांनी आपले कर्त्रुत्व सिध्द करुन गाव आणि शिक्षण संस्थेचा लौकिक वाढवावा, असेही ते म्हणाले.

HTML img Tag Simply Easy Learning    

अध्यक्षीय समारोप करतांना प्रा.डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी जगात होणाऱ्या बदलांची नोंद घेऊन विद्यार्थ्यांनी ध्येय साध्य करण्यासाठी एकच लक्ष ठेऊन यश प्राप्ती करावी असे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुधीर सोनकवडे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पट्टणशेट्टी यांनी केले. कार्यक्रमास सौ.मीनाक्षी बिराजदार, सौ.शारदादेवी बिराजदार, सरपंच वाघमारे ताई,राजेंद्र जाधव,रामप्रसाद बिराजदार,दयानंद चितले,रेवणसिध्द दसले,ग्रामस्थ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला .राष्ट्र भक्तिपर गीतांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button