वडवळ नागनाथ देवस्थानच्या वतीने नगरसेवक महेश इंगळे यांचा सत्कार.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.०६/०२/२६)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व सलग पाचव्यांदा अक्कलकोट नगरपरिषद नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल मोहोळ तालुक्यातील वडवळ नागनाथ देवस्थानच्या वतीने चेअरमन श्रीकांत शिवपुजे यांच्या हस्ते नगरसेवक महेश इंगळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा वडवळ नागनाथ देवस्थानच्या कार्यालयात संपन्न झाला.
यावेळी प्रथमेश इंगळे, बाळासाहेब एकबोटे, प्रा.शिवशरण अचलेर, रमेश शिंदे सर, सुनिल पवार आदींसह वडवळ देवस्थानचे सचिव शाहु शिवपुजे, विश्वस्त
सुभाष शिवपुजे, विश्वस्त संतोष शिवपुजे, बाळासाहेब शिवपुजे, युवराज शिवपुजे, दयानंद शिवपुजे, आकाश शिवपुजे,
महेश कोठीवाले, मानसी दामले मॅडम व
भाविक भक्त, सेवेकरी उपस्थित होते.
फोटो ओळ – वडवळ नागनाथ देवस्थानच्या वतीने चेअरमन श्रीकांत शिवपुजे यांनी नगरसेवक महेश इंगळे यांचा सत्कार करताना छायाचित्रात दिसत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!