गावगाथाठळक बातम्या
Navindagi: गेल्या दोन दिवसांपासून नाविंदगी परिसरात पसरली धुक्याची चादर ; पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता

नाविंदगी (प्रतिनिधी): अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून (दि.१७,१८) मोठ्या प्रमाणात धुक्याचे चादर पसरलेले पहायला मिळत आहे.

पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटून गेले, तरी देखील तालुक्यातील काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. पावसामुळे चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता धुक्याचा सामना करावा लागणार आहे. अर्थात औषधं फवारणीच्या खर्चाचा बोजा शेतकऱ्यांवर पडू शकतो. या धुक्यामुळे सर्वात जास्त कांदा पिकांवर परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, धुक्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्यवेळी औषधी फवारणी करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
