गावगाथा

मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेत पाककला स्पर्धेचे वंदनाताई गावडेच्या हस्ते उद्घाटन ; मराठा मंदिर चिटणीस राजेंद्र गावडे यांच्या कडुन विद्यार्थीचे कौतुक

शैक्षणिक उपक्रम

मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेत पाककला स्पर्धेचे वंदनाताई गावडेच्या हस्ते उद्घाटन ; मराठा मंदिर चिटणीस राजेंद्र गावडे यांच्या कडुन विद्यार्थीचे कौतुक

प्रतिनिधी l अक्कलकोट
लहान वयातच पालकांच्या मदतीने मुलांनी बनवलेले खाद्यपदार्थ पौष्टिक व रूचकर आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना या विविध स्पर्धेच्या माध्यमातून मराठा मंदिराच्या शाळेत संधी मिळत आहे हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन मराठा मंदिरचे सदस्य वंदनाताई गावडे यांनी केले.
येथील मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेमध्ये शनिवारी सकाळी आनंददायी शिक्षण उपक्रमातंर्गत प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय हरित सेना, स्काऊट -गर्ल गाईड तसेच, विज्ञान विषय व समाजशास्त्र विषय क्षेत्रभेट, वनभोजन निमित्ताने विद्यार्थी विद्यार्थीनीसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन करताना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मराठा मंदिर चिटणीस राजेंद्र गावडे, वंदनाताई गावडे, सोनम निशानदार, विहान निशानदार, उपमुख्याध्यापक एस.व्ही.भांगरे, पर्यवेक्षक आर.एस.पडवळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांना एन सी सी व बँन्ड पथकाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. प्रशालेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
पौष्टिकता, सादरीकरण व चव व नावीन्यता या आधारावर परीक्षकांनी पहिले तीन क्रमांक काढले.
सुत्रसंचालन वाय.पी.कबाडे यांनी केले तर आभार अरविंद शिंदे यांनी मानले. यावेळी प्रशालेतील सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button