गावगाथाठळक बातम्या

Akkalkot: बदलापूर व कोलकाता येथील महिलावर अत्याचार करुन हत्या केलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट (प्रतिनिधी ): गेल्या दोन तिन दिवसापूर्वी बदलापूर येथील एका शाळकरी मुलीवर तसेच कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर अत्याचार करुन तिच्या हत्येस कारणीभूत असणाऱ्या आरोपीस त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर, युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष दाजी कोळेकर, अक्कलकोट शहर युवक आघाडीचे अध्यक्ष निलेश लवटे, अक्कलकोट तालुका सरचिटणीस गजानन हिळ्ळी, आंदेवाडी खुर्दचे सरपंच शिरु यळमेली, स्वामीनाथ सोलंकर, प्रसाद मुकडे, राजू पाटील, सुरज तिवारी, संतोष फुलारे, रवी बजंञी, यलप्पा कोटी आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की बदलापूर येथे चिमुकल्या मुलीवर तसेच कोलकाता येथे महिला डॉक्टरवर अत्याचार आणि तिच्या हत्येस कारणीभूत असणाऱ्या आरोपीस त्वरित अटक करून त्याला भरचौकात फाशी देण्यात यावी.

HTML img Tag Simply Easy Learning    

देशात आणि राज्यात अत्याचाराच्या घटना वाढतच चाललेले आहे. देशातील आणि महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. राज्यात लाडकी बहिण योजना आणून महिलांना खुश करण्याचे काम एकीकडे केले जात असताना दुसरीकडे त्यांना सुरक्षा कवच पुरवण्याचे काम शासनाने करावे. असे कृत्य पुन्हा या देशात आणि महाराष्ट्रात होऊ नये म्हणून केंद्र सरकारने कडक महिला सुरक्षित नसल्याने त्या नराधमांना कडक शिक्षा करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button