वागदरीचा युवा धावपटू साहिल नदाफ यांचा नाशिक येथे राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत दुसरा क्रमांक
क्रिडा विशेष


वागदरीचा युवा धावपटू साहिल नदाफ यांचा नाशिक येथे राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत दुसरा क्रमांक

नाशिक :नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशनतर्फे आयोजित ३री नाफ राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साहिल नदाफ यांनी उल्लेखनीय कामगिरी करत २२.७० वेळेत दुसरा क्रमांक पटकावला. ही स्पर्धा महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती.

या यशाबद्दल साहिल नदाफ यांना नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशनच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या यशामध्ये डॉ. मुस्तफा टोपिवाला (अध्यक्ष), हिरालाल लोठे (उपाध्यक्ष), मंगेश राऊत (सचिव), नलिनी कड (संयुक्त सचिव) तसेच मुख्य निर्णायक विजय बंगाले आदी मान्यवर उपस्थित होते.

साहिलच्या या यशामुळे त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
