गावगाथा

*इंडीयन आयडॉल सिंगिग रियालिटी शो मध्ये पहिल्या प्रयत्नात दुसऱ्या फेरीत प्रवेश पटकावणारा सोलापूर जिल्ह्याचा पहिला दिव्यांग गायक रेवणसिद्ध फुलारी*

सिंगिग रियालिटी शो

*इंडीयन आयडॉल सिंगिग रियालिटी शो मध्ये पहिल्या प्रयत्नात दुसऱ्या फेरीत प्रवेश पटकावणारा सोलापूर जिल्ह्याचा पहिला दिव्यांग गायक रेवणसिद्ध फुलारी*
अक्कलकोट:-
देशातील मनोरंजन कार्यक्रमात सोनी टीव्हीवरील इंडीयन आयडॉल हिंदी सिंगिग रियालिटी शो मध्ये हिंदी भाषा येत नसताना सुद्धा प्रयत्न केले तर काहीही अशक्य नाही म्हणून कमीत कमी कालावधीत हिंदी भाषेतील गाणे पाठ करून पहिल्या प्रयत्नात देशातील हजारोंच्या स्पर्धकामधून दुसऱ्या फेरीत प्रवेश पटकावणाऱ्या सोलापूर जिल्हा अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर गावचे सुपुत्र झी कन्नड सारेगमप सीजन 19 चे फायनालिस्ट रेवणसिद्ध फुलारी दिव्यांग गायकाचा सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे .
सीमावर्ती भागात विशेषतः कन्नड भाषिक असलेल्या एका छोटासा गावात जन्म घेतलेल्या रेवणसिद्ध ३१ ऑगस्ट रोजी मुंबईच्या पवार पब्लिक स्कूल चांदिवली संघर्ष नगर पोवई येथे घेण्यात आलेल्या पहिल्या फेरीच्या ऑडिशन मध्ये देशातील दिल्ली,हरियाणा,कर्नाटक,ओरिसा,छत्तीसगढ,उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश,गुजरात,महारष्ट्र समवेत देशातील काना कोपऱ्यातून आलेल्या हिंदी भाषिक हजारोंच्या संख्येत आलेल्या स्पर्धक मधून हिंदी भाषा बोलायला सुद्धा येत नसलेल्या रेवणसिद्ध हिंदी क्लासिकल बंदिश गान विद्या बडी कठीण है,जिता था जिसके लिये,जीसा के लिये मरता था आणि तेरी उम्मिद तेरा इंतजार करते है असे विविध गाणे प्रस्तुत करून ऑडिशन घेणारे निर्णयाकांच्या मन जिंकून दुसऱ्या फेरीसाठी निवड करण्यास भाग पाडले.विशेष म्हणजे हिंदी भाषा एका शब्द ही त्याला बोलता येत नाही परंतु सांगितला भाषेच्या सीमा नसतो म्हणून दाखवून कमी कालावधीत शेकडो गाणे पाठ करणाऱ्या या दिव्यांग गायकाला संगीत क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी शुभेच्छा दिल्या आहेत.नक्कीच पुढील काळात संगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार अशा शब्दात उपस्थित स्पर्धक,गायक,सोनी टीव्हीच्या संयोजक यांनी शुभेच्छा देताना कौतुक करत होते.

चौकट :- खरोखरच सोनी टिव्ही वरील भारत देशातील हिंदी सिंगिग रियालिटी शो मध्ये एक नंबर ला असलेल्या इंडीयन आयडॉल स्पर्धेत मी पहिल्यांदाच भाग घेतलेला असून मला हिंदी भाषा अजिबात येत नसल्याने खूप मेहनत घेऊन हिंदी भाषेतील गाणे गायनाला सुरुवात केले असून येणाऱ्या पुढील काळात अधिक मेहनत घेऊन नक्की एक दिवस इंडीयन आयडॉल मंचावर उभे राहून गायन करण्याच्या लक्ष ठेवले आहे. तसेच गदग विरेश्र्वर पुण्याश्रमचे पंडित पुट्टराज गवई,पंडित पंचाक्षरी गवई, हानगल कुमरेश्र्वर स्वामीजी यांना वंदन करतो. माझ्या संगीत मार्गदर्शक , संगीत शिक्षक पंडित वेंकटेश आलकुड,डॉ. सुचेतन सर,रफीक शेख सर ,माझ्या कुटुंबातील माझे बाबा,भाऊ रोहित ,आई ,वडील आणि ग्रामस्थांना माझा यशाच्या श्रेय देतो .तसेच झी कन्नड वहिनीच्या सर्व टीम ला सुद्धा या वेळी स्मरण करतो झी परिवारातील सर्व सदस्यांना धन्यवाद देतो.
रेवणसिद्ध फुलारी
गायक

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button