गावगाथा

*श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे विश्वशांती व पुण्य संपादनार्थ श्रीमद्देवाधिदेव १००८ श्री मुनिसुव्रत तीर्थंकर पंचकल्याण प्रतिष्टा महामहोत्सवा निमित्त रविवार दि.३१ मार्च पासून ते गुरुवार दि. ४ एप्रिल होणार

श्री कामालाराजे चौकातील राजगृही प्रियदर्शिनी मंगल कार्यालयात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन

अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे विश्वशांती व पुण्य संपादनार्थ श्रीमद्देवाधिदेव १००८ श्री मुनिसुव्रत तीर्थंकर पंचकल्याण प्रतिष्टा महामहोत्सवा निमित्त रविवार दि.३१ मार्च पासून ते गुरुवार दि. ४ एप्रिल पर्यंत श्री कामालाराजे चौकातील राजगृही प्रियदर्शिनी मंगल कार्यालयात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आल्याची माहिती शुभ स्थान श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन (लहान मंदिर) भारत गल्ली, सकल जैन समाज व ट्रस्ट, पंचकल्याण प्रतिष्टा महामहोत्सव कमिटी यांच्या वतीने देण्यात आली आहे.*

HTML img Tag Simply Easy Learning    

परमपूज्य गणधराचार्य १०८ श्री कुंथूसागर महाराज यांचे परमप्रभावक शिष्य प्रज्ञाश्रमण श्री १०८ आचार्य देवनंदीजी महाराज यांचे परमप्रिय शिष्य धर्मप्रभावक मुनि श्री १०८ सकलकीर्ती महारांजांचे परम सानिध्यात भगवान श्री १००८ वृषभनाथ तीर्थकरांच्या समवशरणस्थ वृषभसेन गणधर परंपरागत विद्यमान विराजित दिगंबर जैन संस्कृतिच्या अति प्राचीन धर्मपीठाचे पीठाधीश श्रीमदभिनव ओम स्वस्तिश्रीमद्राय-राजगुरू भूमंडलाचार्यवर्य महावादवादिश्वराय वादिपितामह सकल विद्वज्जन सार्वभौमाद्यनेक बिरुदावलि विराजमान श्रीमन्नीजघटिकस्थान दिल्ली, कोल्हापूर, जिनकंची, पिनगोंडी चतु:सिद्ध सिंहासनाधीश्वर जडगुरू महास्वामी श्री अभिनव लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थानमठ कोल्हापूर, रायबाग, होसूर, बेळगाव स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य, संस्थानमठ, कोल्हापूर, नांदणी, तेरदाळ, बेळगाव आणि स्वस्तिश्री धर्मसेन भट्टारक, वरुर यांच्या उपस्थितीने पंचकल्याण प्रतिष्ठा होणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

या पाच दिवस चालणाऱ्या मांगलिक कार्यक्रमात गर्भकल्याण, जन्मकल्याण, तपकल्याण व केवलज्ञान, मोक्षकल्याण हे होणार असून, प्रमुख प्रतीष्ठाचार्य म्हणून कर्नाटक ईंडी येथील चंद्रकांत पंडित व कर्नाटक सवदी येथील आनंद उपाध्ये हे असणार आहे.
प.पु.मुनिश्री १०८ श्री सकलकीर्ती महाराजांचे अवतरण दिवस १ एप्रिल रोजी साजरा होणार आहे. या कार्यक्रमात मौजीबंधन ११११/-, गर्भसंस्कार ११११/-, ५६ राजकुमार ११११/-, बालदेवकुमार ५५५/- ह्या देखील विधी होरण आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

सहप्रतीष्ठाचार्य म्हणून पं. दीपक अकोळ, पं. संदीप दौंड, पं.संजय कोकटनूर, पं.वृषभ जलालपूर, पं.अविनाश ईंडी व स्थानिक पंडित श्रेणिक पंडित, विनोद पंडित, संगीतकार म्हणून उदगावचे सचिन चौगुले हे कार्यरत असणार आहे.
या क्रर्याक्रमात सौधर्म इंद्र इंद्रायणी, यजमान सपना – प्रशांत रवींद्र विभूते, माता पिता स्वपना प्रवीण गुलाबचंद शहा, सुवर्ण सौभाग्यवती अक्षता रोहित अभय खोबरे, ध्वजारोहण व मंगल कलश स्थापन शशिकांत ज. मोहिरे, मंडप उद्घाटन विद्या अशोक विभूते, दीप प्रज्वलन डॉ. अशोक राघोबा खोबरे, ईशान्य इंद्र राजकुमार वि. विभुते, सानत कुमार रोहित सुधीर लेंगडे, माहेंद्र इंद्र सचिन सुभाष विभुते, कपिल इंद्र सुदर्शन चिंदे, धनपती कुबेर माधुरी स्वप्नील भारत आळंद, यज्ञ नायक सांगर नवलचंद दोशी, शुक्र इंद्र महावीर शि. कांदले, लावंत इंद्र महावीर क. दोशी, ब्रह्म इंद्र अभिनंदन सु. आळ्ळे, आनत इंद्र सुभाष दे. आळंद, प्राणत इंद्र श्रेणिक कासार, शतार इंद्र राजेंद्र काटकर, आरण इंद्र नारायण गडदे व अष्टकुमारीका कु. कार्तिकी गडदे, सलोनी आळंद, युक्ता खोबरे, मानसी स्व. आळंद, राजलक्ष्मी वि. दोशी, वैष्णवी बा. विभुते, तेजस्वी स. विभुते, सहस्त्रा रो. लेंगडे, आहारदान कर्ता नवला रतनचंद पा. बप्प्णकर, कलबुर्गी, स्व. शकुंतला व बाळासाहेब हिरालाल येणगुरे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ येणगुर परिवार अक्कलकोट, लीलावती कंदले व राज इंडे परिवार सोलापूर, जयकुमार बा. विभुते व महेश त्रिभुवणे यांचे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ वनिता त्रिभुवणे परिवार, स्व. सुनंदा व गुणधर लक्ष्मण खोबरे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ श्री अभय गु. खोबरे बंधू परिवार अक्कलकोट या विधी होणार आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

तरी ओम स्वस्तिश्री समस्त धर्मोद्धारक प्रभामंडलायमान चतु:षष्ठी चामर विज्यमान चतुस्त्रींशदतिशय समेत दवादशगण परिव्रत श्रीमदर्हत्परमेश्वरपदकमलमत्त मधुकरायमान समस्त दिग्धेशस्थ सद्धर्म प्रतिपालक-मुनि, आर्यिका, श्रावक, श्राविका, भेदरूप चतु:संघाना कळविण्यास परमानंद होत आहे की, या पंचकल्याण पूजेमध्ये विशिष्ट विद्ववानांचे उदभोदन सांस्कृतिक कार्यक्रम, भक्ती-भजन होणार आहे, तरी सर्वांनी ह्या मांगलिक कार्यक्रमात भाग घेऊन सम्यक पुण्य प्राप्त करून घेण्याची विनंती करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी बाहेरून येणाऱ्या अतिथीसाठी अल्पोपहार, भोजन व आवास व्यवस्था करण्यात आलेली आहे. अल्पोपहारसाठी ची व्यवस्था अॅड. हर्षवर्धन ह. एखंडे, प्रफुल्ल साखरे, अनिल शा. देशमाने, विजयकुमार खोबरे, अॅड. संतोष खेबरे, साताप्पा बाबुराव कासार यांनी केलेली आहे. या कार्यक्रमासाठी संपर्क अभय खोबरे ९३७११३५५०३, प्रवीण शहा ९८५००४८१४८, राहुल आळंद ७५८८८७७९८१, प्रशांत विभुते ८२०८३६६१६४ यांना संपर्क साधावेत असे आवाहन संयोजक विश्वशांती व पुण्य संपादनार्थ श्रीमद्देवाधिदेव १००८ श्री मुनिसुव्रत तीर्थंकर पंचकल्याण प्रतिष्टा महामहोत्सव समितीने केले आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button