HTML img Tag
शिवरायांचा इतिहास आता कन्नड भाषेत
बंगळूर येथे शुक्रवारी शिवचरित्राचे होणार प्रकाशन
बंगळूर (कर्नाटक) येथे प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी कन्नड भाषेतील पहिल्या ‘समग्र शिवचरित्र’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
पुण्यातील मावल जवान संस्था आणि कर्नाटक मराठा वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बंगळूर प्रेस क्लबच्या सभागृहात हा सोहळा होणार आहे. या वेळी तंजावरचे महाराज श्रीमंत शिवाजी राजे भोसले, कर्नाटकमधील मंत्री पी. जी. आर. सिद्धा, विजयनगर साम्राज्याचे वंशज राजा कृष्णदेवराय, असोसिएशनचे अध्यक्ष मनोजकुमार हिरे, पुणे जिल्हा विभागीय नियोजन आयोगाचे अध्यक्ष बाजीराव शिंदे, त्रिवेणीचे सेक्रेटरी अध्यक्ष राजेंद्र शिंदे, मावल जवान संस्थेचे संस्थापक दत्ताजी तलावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दत्ताजी तलावडे यांनी लिहिलेल्या मूळ मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषांतील शिवचरित्राचा कन्नड भाषेत प्रा. शिवाजीपाटील चव्हाण यांनी अनुवाद केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास कन्नड भाषक जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले आहे. दत्ताजी तलावडे म्हणाले की, भारतीयांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या अज्ञात पण थोर कार्याची माहिती मिळावी, यासाठी शिवचरित्राचे कन्नड भाषेत अनुवाद करण्यात आला आहे
Back to top button
×
No WhatsApp Number Found!