गावगाथा

*गोगावच्या सरपंच सौ वनिता सुरवसे यांना राज्यस्तरीय यशवंत गौरव पुरस्कार 2024 प्रदान*

पुरस्कार सन्मान

*गोगावच्या सरपंच सौ वनिता सुरवसे यांना राज्यस्तरीय यशवंत गौरव पुरस्कार 2024 प्रदान*

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट (प्रतिनिधी) : अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन इंडियाच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील शिक्षकांचा सन्मान सोहळा सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता. शिक्षक सरपंच आणि उद्योजक अशा तिन्ही क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या मान्यवराचा सन्मान अविष्कार चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या सोहळ्यात अक्कलकोट तालुक्यातील गोगावच्या सरपंच सौ वनिता सुरवसे यांचा राज्यस्तरीय यशवंत गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष एड. विकास जाधव यांच्या हस्ते आणि श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचे पुरस्कार प्रदान केले.

HTML img Tag Simply Easy Learning    


सरपंच सौ वनिता सुरवसे यांना सरपंच परिषदेने सोलापूरच्या जिल्हा समन्वयक असुन परिषदेमार्फत सर्व सरपंचांना मार्गदर्शन करत वेगवेगळ्या आंदोलनात सरकारला वेठीस धरून मागण्या पूर्णत्वास आणल्या. त्यांच्या गावामध्ये मोठ मोठी कामे करून अक्कलकोट तालुक्यातचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गोगाव ग्रामपंचायत चे नाव उज्वल केले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील, पदमश्री श्री पोपटराव पवार, सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे उपाध्यक्ष एड. विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक चिरंजीव कामे ग्रामपंचायत मध्ये करून ग्रामपंचायतचा महसूल तिपटीने वाढविला. महाराष्ट्रातील ग्रामविकास मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय कृषिमंत्री, केंद्रीय ग्रामविकास मंत्री यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना निवेदन देऊन ग्रामपंचायत च्या अडचणी सांगितल्या.वेळोवेळी त्यांचे केलेले काम पाहून, कामाची दखल घेऊन अविष्कार फाउंडेशनने त्यांना राज्यस्तरी यशवंत गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्याबद्दल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री संजय पवार व अन्य मान्यवरांचे सरपंच सौ वनिता सुरवसे यांनी मनःपूर्वक आभार मानले आहे.
या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते उमेश पाटील, अविष्कार चे जिल्हाध्यक्ष श्री सात पटेल, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष श्री मनोज कंगळे, जिल्हा संघटक सौ स्नेहल खंकाळ, रेखा सोनकवडे, ए बी शेख,जब्बार सिकलगार, शंकरराव देशमुख,संतोष गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन श्री संजय घोडके सर यांनी केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button