गावगाथा

आळगे येथे सेवापूर्ती सत्कार सोहळा व शिक्षण परिषद उत्साहाने संपन्न 

विशेष कार्यक्रम

आळगे येथे सेवापूर्ती सत्कार सोहळा व शिक्षण परिषद उत्साहाने संपन्न 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळगे येथे शिक्षण परिषद व सेवापूर्ती सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केंद्रप्रमुख श्री आमसिद्ध मेत्रे सर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अक्कलकोट तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षण अधिकारी श्री प्रशांत आरबाळे साहेब होते. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजनाने झाले प्रतिमेचे पूजन शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष श्री गड्डेप्पा कोरे सावकार यांच्या हस्ते करण्यात आले. आणि या कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्याचा विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने स्वागत केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा आळगे येथून सेवानिवृत्त झालेले श्री अकलाक शेख सर यांचे स पत्नीक मुंढेवाडी केंद्राच्या वतीने गटशिक्षणाधिकारी अरबाळे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. प्रास्ताविक केंद्रप्रमुख अमसिद्ध म्हेत्रे सर यांनी केले. यानंतर सदरखेड सर, सरपंच महांतेश हत्तुरे, अध्यक्ष गड्डेप्पा कोरे, भैरगोडे सर, सत्कारमूर्ती अकलाख शेख सर अक्कलकोट तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी मा श्री प्रशांत अरबाळे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या शिक्षण परिषदेला केंद्रातील सर्व शाळेतील शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री शिवशंकर हत्तुरे सर आभार शिवानंद कोळी सर यांनी मांडले. या कार्यक्रमाला गावातील शालेय व्यवस्थापन कमिटीचे उपाध्यक्ष श्री संतोष चराटे , उपसरपंच रियाज मुला, महादेव पाटील,उर्दूचे अध्यक्ष सलीम पाटील, हुसेनी मुल्ला, रजाक मुला, व्हनप्पा कोळी, तंटामुक्त अध्यक्ष शरणु माळगे, दयानंद कोरे सावकार ,गुरु माळगे, मलकारी पुजारी, सिद्धाराम टाकळे, निजाम कुमठे, रुक्मुद्दीन कुमठे,भिमण्णा चिकऴी, काशिनाथ हत्तुरे, रवि पुजारी, मालकण्णा पाटील, संजय कुमार कोळी, बसवराज सुतार , गौडप्पा अंबलगी, पिंटु टाकळे , संगमेश बिराजदार, महेश कुंभार, अमोगी पुजारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button