गावगाथा

*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव -२०२४ चे आयोजन*..

. श्री शारदीय नवरात्र उत्सव निमित्त घटस्थापना सौ.व श्री अमोलराजे जन्मेजयराजे भोसले, कार्याध्यक्ष, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या हस्ते संपन्न होणार

*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव -२०२४ चे आयोजन*…

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने यंदापासून श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव -२०२४ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव शामराव मोरे यांनी दिली आहे.*

HTML img Tag Simply Easy Learning    

महाराष्ट्राची कुलस्वामिनी, शक्तीदेवता आई श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवात न्यासाच्या परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरा लगत जाणता राजा युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा प्रसंगाचा भव्य हालत्या देखाव्याचे उद्घाटन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी ७ वा. होणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

या हलत्या देखावा हा घटस्थापने पासून ते विजयादशमी पर्यंत सर्व देवी भक्त व शहर वाशीयांसाठी असणार आहे. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावेत असे आवाहन संस्थेचे सचिव शामराव मोरे यांनी केले आहे. दि. ३ ऑक्टोबर ते दि. ११ ऑक्टोबर पर्यंत श्री तुळजाभवानी माता मंदिरात पदाधिकारी व सेवेकऱ्यांच्या हस्ते पूजन संपन्न होणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

*🔶चौकट :*
गुरुवारी सकाळी ११ वा. श्री शारदीय नवरात्र उत्सव निमित्त घटस्थापना सौ.व श्री अमोलराजे जन्मेजयराजे भोसले, कार्याध्यक्ष, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button