अनंत चैतन्य प्रशाला, हन्नूर येथे विविध उपक्रमाने ” शिक्षण सप्ताहा”ची सांगता ——
शिक्षण सप्ताह

अनंत चैतन्य प्रशाला, हन्नूर येथे विविध उपक्रमाने ” शिक्षण सप्ताहा”ची सांगता ——
—————————————-विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, तो आत्मनिर्भर बनावा आणि त्यासोबतच त्याने वृक्षसंवर्धन, पर्यावरण,जैवविविधता, जल संरक्षण यासारख्या विविध शासकीय उपक्रमात सहभागी होवून एक सुजाण नागरिकत्वाचे कर्तव्य पार पाडत त्याने देश विकासात हातभार लावावा याकरिता गेले सात दिवस सुरू असलेल्या ” शिक्षण सप्ताह” या शासनाच्या महत्वकांक्षी योजनेचा सांगता समारंभ
आज रविवार दिनांक २८ जुलै २०२४ रोजी महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य व कनिष्ठ महाविद्यालय हन्नूर येथे विविध उपक्रमाने संपन्न करण्यात आला. सुरुवातीला प्रशालेच्या वतीने शाळांचे सक्षमीकरण ,शाळा व समाज यामध्ये संबंध प्रस्थापित करण्याबरोबरच समाजातील विविध घटकांमध्ये शाळे विषयी उत्तरदायित्त्व निर्माण करणे हा ” विद्याजंली पोर्टल”चा मुख्य हेतू असल्याने प्रशालेत “शालेय स्वंयसेवक कार्यक्रम ” घेण्यात आले व यात स्वयंस्फूर्तीने सहभागी होणाऱ्या, शाळेला मदत करणाऱ्या सदस्यांची नांवे शालेय फलकावर लिहिण्यात आले. यावेळी प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री.शहाजी माने यांनी “विद्याजंली कार्यक्रमाविषयी” विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यानंतर पर्यावरणपूरक वातावरण निर्मिती व जनजागृती करण्याकरिता गावातून ” प्रभात फेरी ” काढण्यात आली. या कार्यक्रमास अनुसरून प्रशालेच्या वतीने “घोष्यवाक्य पोस्टर स्पर्धा” घेण्यात आली. कला महाविद्यालयाच्या व प्रशालेच्या मुलां- मुलींनी या स्पर्धेस भरभरून प्रतिसाद दिला.यासोबतच “पौष्टिक आहार स्पर्धेचे”ही आयोजन करण्यात आले होते.यात पाचवी ते दहावीच्या मुलां- मुलींनी सक्रिय सहभाग नोंदवत कुणी ढोकळा,इडली,अप्पे,मोड आलेली कडधान्ये तर कुणी शेंगालाडू,डिंकलाडू,खीर,लाफशी, ड्रायफुट युक्त शिरा,सलाड असे विविध प्रकारचे उष्मांक वाढवणारे पदार्थ व मिष्टान्न बनवून आणले होते.या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी “स्नेह भोजनाचा” मनमुराद आनंद लुटला.यावेळी प्रशालेचे सेवानिवृत्त लिपिक श्री.अब्दुलकरीम मुल्ला यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या कडून ” केळी वाटप” केले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अशोक साखरे यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी पर्यवेक्षक श्री. ज्ञानदेव शिंदे, श्री. धनंजय जोजन,प्रा.रविंद्र कालीबत्ते, श्री. सरदार मत्तेखाने, श्री.अब्दुल अझीझ मुल्ला, श्री.स्वामीनाथ कोरे,शिक्षिका सौ. मृदुलादेवी स्वामी, सौ. मल्लम्मा चप्पळगाव, सौ. स्वप्नाली जमदाडे व विद्यार्थी उपस्थित होते.
