गावगाथा

कोरोनाच्या JN1 या नव्या व्हेरिएंटचा प्रसार आजपासून श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सतर्कतेचे पालन

शासन निर्देशास अनुसरून मंदिरातील भाविकांना तात्काळ मास्कचे वाटप

कोरोनाच्या JN1 या नव्या व्हेरिएंटचा प्रसार आजपासून श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सतर्कतेचे पालन

HTML img Tag Simply Easy Learning    

शासन निर्देशास अनुसरून मंदिरातील भाविकांना तात्काळ मास्कचे वाटप

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

(श्रीशैल गवंडी) दि.२३/१२/२३ — कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा बळवण्याची शक्यता आहे, अशी चिन्हे दिसत असतानाच आज शासन निर्देशानुसार कोरोनाच्या JN1 या नव्या व्हेरिएंटचा उत्पात झाला असल्याचे निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या JN1 या नव्या व्हेरिएंटचा प्रसार बळवण्याची शक्यता असल्याचे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले. यानिमित्ताने आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे व अक्कलकोट नॉर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सतर्कता बाळगण्याच्या उद्देशाने शासन निर्देशास अनुसरून मंदिरात स्वामींच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना तात्काळ मास्कचे वाटप केले. याप्रसंगी बोलताना अक्कलकोट नॉर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी गतकाळात साधारणपणे गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोना प्रादुर्भावाचा संसर्ग आटोक्यात आला होता. पण त्याचवेळी (WHO) (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन) जागतिक आरोग्य संघटने कडून पुढील काही वर्षातही कोरोना पुन्हा पुन्हा डोके वर काढेल असे जाहीर करण्यात आले होते. या अनुषंगानेच आता कोरोनाचा JN1 हा नवा व्हेरिएंट उदयास आला आहे, म्हणून शासन निर्देशानुसार या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला लढा देण्यासाठी व पुन्हा मागच्या वेळेस प्रमाणे सतर्कतेचे काही नियम पालन करणे गरजेचे आहे. कारण स्वामी समर्थांच्या या वटवृक्ष मंदिरात
देशविदेशातून व राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविक येथील स्वामींच्या दर्शनाकरिता येत असतात. दररोज स्वामींच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांच्या संख्येत पुणे-मुंबई येथील स्वामी भक्तांची संख्या लक्षणीय असते. त्यामुळे कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा प्रादुर्भाव रोखणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे, म्हणून आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात समितीचे अध्यक्ष महेश इंगळे व प्रथमेश इंगळे व माझ्या हस्ते भाविकांना मास्कचे वाटप करण्यात आले असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मास्कचे वाटप करताना मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button