गावगाथा

तालुका उप अधिक्षक भूमिअभिलेख कार्यालयाकडून जुने अभिलेख स्क्यानिंगचे काम जिल्हा अधिक्षक दादासाहेब घोडके व उप अधिक्षक शैलेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर — मुख्यालय सहाय्यक संतोष बिराजदार

शासकीय कार्यालय

तालुका उप अधिक्षक भूमिअभिलेख कार्यालयाकडून जुने अभिलेख स्क्यानिंगचे काम जिल्हा अधिक्षक दादासाहेब घोडके व उप अधिक्षक शैलेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर — मुख्यालय सहाय्यक संतोष बिराजदार

HTML img Tag Simply Easy Learning    

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*येथील तालुका उप अधिक्षक भूमिअभिलेख कार्यालयाकडून जुने अभिलेख स्क्यानिंगचे काम जिल्हा अधिक्षक दादासाहेब घोडके व उप अधिक्षक शैलेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्यालय सहाय्यक संतोष बिराजदार यांनी दिली आहे.*

HTML img Tag Simply Easy Learning    

भूमिअभिलेख हे शासकीय कार्यालय शेतकरी व तहसीलदार कार्यालय यांच्यातील महत्वाचा दुवा आहे. जागा-जुमला बाबतचा शासनाचा एक महत्वाचा विभाग असून, महसूल विभागाचे वर्धन करीत असताना शासनाकडून या भूमी अभिलेखाच्या जतन व संवर्धनाच्या दृष्ठीने महत्वाचे पाऊल उचलले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

गेल्या अनेक वर्षापासून अभिलेख हे सतत हाताळण्याने जीर्ण व जुने होत असल्याने याकरिता जुन्या अभिलेखाचे स्क्यानिंग करण्याचे काम उप अधिक्षक कार्यालयाचे काम प्रगतीपथावर आहे. तालुक्यातील १२१ गावांचे ऑनलाइन डिजिटल डाटा स्क्यानिंगचे काम गेल्या दोन महिन्यापासून भूमी अभिलेख कार्यालयात सुरु आहे. यास अजून १० महिन्याचा कालावधी जाण्याची शक्यता आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

तालुक्यातील १२१ गावांचे गट नकाश्यांचे स्क्यानिंग झालेले आहे. उर्वरित कोर्ट कमिशन, कोर्ट वाटप, बिगर शेती प्रकरणे, पोट हिस्से, फाळणी यांचे स्कानिंगचे काम प्रगतीपथावर आहे. भूमी अभिलेख कक्षातील १३ प्रकारच्या अभिलेखाचे संगणीकरण व नुतनीकरण होत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button