गावगाथा

सहलीच्या माध्यमातून तळेवाड येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास व भक्ती निवास परिसरास भेट.

सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी घेतला भोजन प्रसादाचा व परिसरात वावरण्याचा आनंद.

सहलीच्या माध्यमातून तळेवाड येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास व भक्ती निवास परिसरास भेट.

सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी घेतला भोजन प्रसादाचा व परिसरात वावरण्याचा आनंद.

(अक्कलकोट, श्रीशैल गवंडी)
(दिनांक – ९/१०/२४) – तालुक्यातील तळेवाड येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेच्या ५० विद्यार्थी विद्यार्थिनींची सहल नुकतेच येथील श्री. स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता आली होती. याप्रसंगी या विद्यार्थ्यांनी अक्कलकोटच्या विविध परिसरांना भेटी देण्यासोबतच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. आलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींची निवासाची व भोजन प्रसादाची तसेच चहा नाष्ट्याची सोय मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या पुढाकाराने व देवस्थानच्या वतीने देवस्थानच्या भक्तनिवास येथे करण्यात आली होती. या निमित्ताने विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्वामींच्या भोजन प्रसादाचा व श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामी दर्शनाचा तसेच भक्तनिवास परिसरात वावरण्याचा आनंद घेतला. याप्रसंगी बोलताना संपर्क शिक्षक मल्लिकार्जुन सोमेश्वर सर यांनी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांचे धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक या सर्वच क्षेत्रातील उपक्रमात मोलाचे योगदान असते याची जाण ठेवून आम्ही तळेवाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींची सहल अक्कलकोटला आणण्याचे नियोजन केले होते. या संदर्भाचा प्रस्ताव आम्ही महेश इंगळे यांच्या समोर ठेवल्यानंतर महेश इंगळे यांनी या सहलीसाठी तात्काळ होकार देऊन सहल यशस्वी होण्यास सहकार्य केले, त्यामुळे आम्ही श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीचे व चेअरमन महेश इंगळे यांचे विशेष ऋणी आहोत असे मनोगत व्यक्त केले. संबंधित सहल यशस्वी होण्याकामी सुरज जाधव, युवराज राठोड, मल्लिकार्जुन सोमेश्वर यांनी तर भोजन व निवासाची व्यवस्था उत्तमरीत्या पार पडणे कामी संतोष पराणे यांनी परिश्रम घेतले.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – तळेवाड जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनी स्वामी समर्थांच्या भोजन प्रसादाचा लाभ घेताना दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button