अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून होत असलेले कार्य म्हणजे सेवा साधना, प्रार्थना, परमात्मा याची प्रचिती — प्रसिद्ध सिने कलाकार विनय एडेकर
अन्नक्षेत्र मंडळ अक्कलकोट

अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून होत असलेले कार्य म्हणजे सेवा साधना, प्रार्थना, परमात्मा याची प्रचिती — प्रसिद्ध सिने कलाकार विनय एडेकर

अक्कलकोट : (प्रतिनिधी)*
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून होत असलेले कार्य म्हणजे सेवा साधना, प्रार्थना, परमात्मा याची प्रचिती असल्याचे मनोगत प्रसिद्ध सिने कलाकार विनय एडेकर यांनी व्यक्त केले.*

ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

यावेळी न्यासाचे बाळासाहेब घाडगे, अतिश पवार, गोटू माने, निखील पाटील, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, बाळासाहेब पोळ, प्रवीण घाडगे, संभाजीराव पवार, सागर पवार, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, तानाजी पाटील, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, धनंजय निंबाळकर, मुन्ना कोल्हे, बसवराज क्यार, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, एस के स्वामी, महांतेश स्वामी, शिव स्वामी, मल्लिनाथ कोगनुरे, शावरेप्पा माणकोजी, कल्याण देशमुख, विशाल घाडगे, विठ्ठल रेड्डी, समर्थ चव्हाण यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
