Solapur Airport: अखेर मुहूर्त ठरला..! २० डिसेंबरपासून सोलापूर विमानतळावरून मुंबई आणि गोवासाठी थेट विमानसेवा सुरू होणार ; पाहा वेळापत्रक
सोलापूर (प्रतिनिधी): सोलापूरकरांची बहुप्रतीक्षित विमानसेवा अखेर सुरू होणार आहे. होटगी रोड सोलापूर विमानतळावरून फ्लाय ९१ एअरलाईन्सची विमानसेवा २० डिसेंबर २०२४ पासून सुरु होणार असून मुंबई आणि गोवा यांसारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी थेट उड्डाणे दिली जाणार आहेत.

ही सेवा सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंचाच्या अथक प्रयत्नांमुळेच हे स्वप्न साकार होऊ शकले आहे. सोलापूरकरांसाठी हे अत्यंत अभिमानाचे आणि आनंदाचे क्षण आहेत.


मुंबईसाठी उड्डाण वेळापत्रक


🛬 सोलापूर – मुंबई सकाळी ०९:४० वाजता (स. १०:४० मुंबई आगमन)
🛬 मुंबई – सोलापूर दुपारी १२:४५ वाजता (दु. ०१:४५ सोलापूर आगमन)
गोवासाठी उड्डाण वेळापत्रक
🛬 सोलापूर – गोवा दुपारी ०२:१५ वाजता (दु. ०३:१५ गोवा आगमन)
🛬 गोवा – सोलापूर सकाळी ०८:१० वाजता (स. ०९:१० सोलापूर आगमन)
सोलापूरच्या विकासासाठी एक मोलाची पायरी
सोलापूर विकास मंचाच्या नेतृत्वात वर्षानुवर्षे सुरु असलेल्या प्रयत्नांचे हे फळ आहे. या सेवेमुळे पर्यटन, उद्योगधंदे आणि व्यापारी क्षेत्राला नवे बळ मिळणार आहे.