ग्रामीण घडामोडी

स्टेट बँक ऑफ इंडिया वागदरी शाखे तर्फे तीन लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप : एसबीआय खातेदाराने बँकेत विमा उतरवला पाहिजे.विभागीय निबंधकार निशांत कुमार जयशवाल

विभागीय निबंधकार निशांतकुमार जशवाल यांनी वागदरी एसबीआय शाखेतील तीन लाभार्थ्यांचा विविध विम्याचे धनादेश देऊन सत्कार केला. वागदरी बँकेचे व्यवस्थापक अरविंद कुमार, प्रवीणा बेरे आणि इतर आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया वागदरी शाखे तर्फे तीन लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप : एसबीआय खातेदाराने बँकेत विमा उतरवला पाहिजे.विभागीय निबंधकार निशांत कुमार जयशवाल

HTML img Tag Simply Easy Learning    

वागदरी –जीवनचा भरवसा नाही,प्रत्येक ग्राहकांचा विमा करा जीवनात अनेक अडचणी येतात.माणसाचे कधी काय होईल,घरच्या मालकाचे काय होईल हे कोणालाच सांगता येत नाही पण त्याच्या कुटुंबाला त्रास होईल. जर असे होऊ नये, तर विभागीय निबंधकार निशांत कुमार जयशवाल यांनी ग्राहकांना आवाहन केले की, प्रत्येक एसबीआय खातेदाराने बँकेत विमा उतरवला पाहिजे.अक्कलकोट तालुक्यातील वागदरी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने बँकेच्या खातेदार तीन लाभार्थी वारसांना धनादेश दिले.एसबीआयच्या प्रत्येक ग्राहकाला त्यांच्या खात्यातून तुमच्या जीवनाचा विमा काढण्याचे आवाहन करून त्यांनी बँकेच्या विविध लाभाच्या योजनांची माहिती दिली.
भुरिकवठे येथील अनिला अष्टे भारतीय सैन्यात असताना काही महिन्यांपूर्वी एका अपघातात त्यांना प्राण गमवावे लागले होते. एसबीआयमध्ये सामान्य विमा अंतर्गत त्यांचे वैयक्तिक बँक खाते होते. त्यांची पत्नी जयश्री अष्टे यांना 20 लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. या अपघातात किरनल्ली येथील नैमुना सलीम पटेल यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्यासाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा अंतर्गत 2 लाख रुपए मंजूर करण्यात आले. त्यांचे पती सलीम पटेल यांना दोन लाख रुपये मंजूर करण्यात आले होते.
वागदरी गावातील परमेश्‍वर जत्रेत रथाच्या चाकाखाली सापडून प्राण गमवावे लागलेल्या इराप्पा नांदे यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत 2 लाख रुपये आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत 2 लाख एकूण 4 लाख रुपयांची मदत मिळाली. त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. त्यांच्या पत्नी अंबुबाई नंदे यांचा एसबीआयचे विभागीय प्रभंधक निशांतकुमार जयशवाल यांच्या हस्ते त्यांच्या वारसांना धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    


वागदरी शाखा व्यवस्थापक अरविंद कुमरा यांनी बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना चांगली सेवा देऊन शाखेतील काही समस्यांचे निराकरण करण्याचे विनंती करून येथील विविध योजनांचा लाभ बँक ग्राहकांनी घेण्याचे आवाहन केले.
विभागीय प्रबंधक बँकेचे कर्मचारी प्रवीण बेरे, सुरक्षा रक्षक अर्जुन मिठारे, अंकुश सावंत, धा नलिंग सलगरे, बँक सखी प्रगती नरुणे, ग्राहक सेवा केंद्राचे पराजकुमार दुर्गे, महेश लगशेट्टी यांचा सत्कार केले . ग्राहकांच्या वतीने महादेव सोनकवडे व विजय गायकवाड यांनी प्रबधंक व वागदरी शाखा व्यवस्थापक अरविंद कुमार यांचे फेटा बांधून सत्कार केले. सोलापूर जिल्हा जागतिक लिंगायत महासभेचे अध्यक्ष झाल्या बद्धल शिवानंद गोगाव यांचे बँके तर्फे सत्कार करण्यात आले. बरेच ग्राहक उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

विभागीय निबंधकार निशांतकुमार जशवाल यांनी वागदरी एसबीआय शाखेतील तीन लाभार्थ्यांचा विविध विम्याचे धनादेश देऊन सत्कार केला. वागदरी बँकेचे व्यवस्थापक अरविंद कुमार, प्रवीणा बेरे आणि इतर आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button