अक्कलकोट सालाबादाप्रमाणे श्रावण मासानिमित्त वीरशैव महिला मंडळ रविवार, 27 ऑगस्ट 2023 रोजी दु.3 वाजता व्याख्यानमालेचे आयोजन ..,
श्रावण मास विशेष 2023
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230825-WA0032-450x470.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
अक्कलकोट सालाबादाप्रमाणे श्रावण मासानिमित्त वीरशैव महिला मंडळ रविवार, 27 ऑगस्ट 2023 रोजी दु.3 वाजता व्याख्यानमालेचे आयोजन ..,
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
अक्कलकोट, दि.25 : सालाबादाप्रमाणे श्रावण मासानिमित्त वीरशैव महिला मंडळ अक्कलकोट यांच्या तर्फे रविवार, 27 ऑगस्ट 2023 रोजी दु.3 वाजता व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
मंडळाच्या संस्थापिका महानंदा उडचाण ह्या वीरशैव समाजातील महिला वर्गाला एकत्रित करुन विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबवित असून मल्लम्मा पसारे व शिवकांत पसारे या मार्गदर्शिका म्हणून कार्यरत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
वीरशैव महिला मंडळ हे गत पाच-सहा वर्षापासून श्रावण मासात विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबवित आहेत. याच अनुषंगाने श्रावण मासानिमित्त रविवार, 27 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3 वा. लोकापुरे मंगल कार्यालय येथे ‘चंदन व प्रगतशील स्त्री शेतकरी’ या विषयावर स्त्री शक्तीचा जागर, स्त्रीचे समाजातील स्थान, सबलीकरणाबाबत कविता उमाशंकर मिश्र ह्या मार्गदर्शन करणार असून शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी वर्ग व महिलांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)