श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे नियोजन हे एक आदर्श वस्तुपाठ – क्रिकेटपटू कर्नल दिलीप वेंगसरकर
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या उपस्थितीत सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला,


श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे नियोजन हे एक आदर्श वस्तुपाठ – क्रिकेटपटू कर्नल दिलीप वेंगसरकर

*अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचे नियोजन हे एक आदर्श वस्तुपाठ असल्याचे मनोगत भारताचे नामवंत माजी क्रिकेटपटू कर्नल दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले.*

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या उपस्थितीत सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. त्यांच्या सामावेत मदन देशमुख, दीपक जाधव, नितीन चप्पळगांवकर, विशाल सुरवसे हे उपस्थित होते.

यावेळी मंडळाचे पुरोहित अप्पू पुजारी, सौरभ मोरे, एस.के.स्वामी, अभियंता अमित थोरात, बाळासाहेब घाडगे, सतीश महिंद्रकर, शहाजी यादव, नामा भोसले, दत्ता माने, शावरेप्पा माणकोजी, मल्लिकार्जुन कोगाणुरे, कल्याण देशमुख, अजित चौधरी परभणी, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
