गावगाथाठळक बातम्या
Akkalkot: अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अटल प्रतिष्ठानच्या वतीने मूकबधिर शाळेत सेवा संपन्न

अक्कलकोट : देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीच्या जयंतीनिमित्त अटल प्रतिष्ठान अक्कलकोटच्या वतीने निवासी मूक बधिर शाळेतील विद्यार्थांना खाऊ वाटप करण्यात आले.

अटल प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत संस्थेची सेवा पोहचविण्याचे काम सुरू केली असून आज आपल्या दिव्यांग विद्यार्थांमध्ये अटलजींची जयंती समर्पित करावी असे उद्देश असल्याचे अध्यक्ष शिवशंकर स्वामी यांनी सांगितले. कार्यक्रमास प्रतिष्ठानचे बसवराज साखरे, राहुल वाडे, प्रभाकर म्हेत्रे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
