महेश इंगळेंच्या नेतृत्वात भाविकांना स्वामी दर्शनाचे उत्तम नियोजन – मनमोहन कलंत्री
मनमोहन कलंत्री यांचा देवस्थान मध्ये सत्कार करताना महेश इंगळे, शेखर आडवीतोटे दिसत आहेत.

महेश इंगळेंच्या नेतृत्वात भाविकांना स्वामी दर्शनाचे उत्तम नियोजन – मनमोहन कलंत्री

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि. ४/१२/२३) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात अनेक स्वामी भक्त स्वामींच्या दर्शनाकरिता येत असतात. त्याप्रमाणे आज मी व माझे कुटुंबीयही श्री स्वामींच्या दर्शनाकरिता येथे आलो असता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे हे स्वतः पुढाकाराने आमच्या करिता श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाची उत्तम सोय करून देऊन मनोभावे स्वामी दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली.केवळ आमच्यासाठीच नाही तर ते नियमितपणे स्वामींच्या मंदिरात सर्व स्वामी भक्तांचे सुलभ स्वामी दर्शन कसे होईल याकडे सातत्याने नियमितपणे लक्ष ठेवून असतात. ठीक आहे ? गर्दीमध्ये एखाद्या वेळेस शांत चित्ताने दर्शन घेता येत नसेल परंतु स्वामींचे सुलभ दर्शन मात्र सर्व भाविकांना नक्कीच होते याची आम्हाला खात्री आहे, म्हणून श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामींचे नियमितपणे भाविकांना स्वामी दर्शनाची उत्तम संधी लाभत असते, त्यामुळे या वटवृक्ष मंदिरात महेश इंगळे यांच्या नेतृत्वात भाविकांना स्वामी दर्शनाचे उत्तम नियोजन असल्याचे मनोगत ऑल इंडिया ॲग्रो इनपूट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे सहपरिवार दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी मनमोहन कलंत्री व कुटुंबीयांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. त्याप्रसंगी कलंत्री बोलत होते. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, शेखर आडवीतोटे, श्रीशैल गवंडी, अमर पाटील, प्रसाद सोनार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, आदीसह भाविक भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – मनमोहन कलंत्री यांचा देवस्थान मध्ये सत्कार करताना महेश इंगळे, शेखर आडवीतोटे दिसत आहेत.
