गावगाथा

अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यास हे अध्यात्म, संस्कृती आणि परंपरा यांचा दैवी संगम असून, मंडळाकडून क्रीडा पट्टूनां प्रोत्साहन दिले जाते हि बाब अत्यंत उल्लेखनीय व अभिमानास्पद कु. वैष्णवी आडकर

अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यास हे अध्यात्म, संस्कृती आणि परंपरा यांचा दैवी संगम असून, मंडळाकडून क्रीडा पट्टूनां प्रोत्साहन दिले जाते हि बाब अत्यंत उल्लेखनीय व अभिमानास्पद कु. वैष्णवी आडकर

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट : (प्रतिनिधी)

HTML img Tag Simply Easy Learning    

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यास हे अध्यात्म, संस्कृती आणि परंपरा यांचा दैवी संगम असून, मंडळाकडून क्रीडा पट्टूनां प्रोत्साहन दिले जाते हि बाब अत्यंत उल्लेखनीय व अभिमानास्पद असल्याचे मनोगत प्रसिद्ध लॉंग टेनिस पट्टू व साई सुषृत डेवलपर्स पुणेचे निहार आडकर यांच्या कन्या कु. वैष्णवी आडकर यांनी व्यक्त केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

त्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या.

HTML img Tag Simply Easy Learning    

कु. वैष्णवी आडकर ह्या अहमदाबाद येथे दि. २३ ते २९ डिसेंबर दरम्यान झालेल्या ITF-WS स्पर्धेत महिलांच्या गटात लॉंग टेनिस मध्ये एकेरी आणि दुहेरी विजय संपादन केले आहे. एकेरीत तिसऱ्या मानांकित असलेल्या अंतिम सामन्यात कु. वैष्णवीने प्रभावी कामगिरी करत डेन्मार्कच्या पाचव्या मानांकित एलिना जमशिदीचा ६-२, ६-१ असा पराभव केला दुसर्या मानांकित कु. वैष्णवी ने कु. पूजा इंगळे सोबत जोडी करत पहिल्या मानांकित जणांची जोडी ही नोका कोबा याशी आणि अती नागता यांचा अटीतटीच्या तीन सेटच्या सामन्यात ६-२,२-६,१२-१० असा पराभव केला. कु. ऋतुजा भोसले नंतर महाराष्ट्रातील हे यश मिळवणारी कु. वैष्णवी ही एकमेव खेळाडू आहे. त्यांच्या समवेत साई सुषृत डेवलपर्स पुणेचे निहार आडकर, रामदास तांबे, राजेंद्र पाटील आदिजन उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी पुरोहित अप्पू पुजारी, प्रवीण घाडगे, गोटू माने, निखील पाटील, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, तानाजी पाटील, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, बसवराज क्यार, अनिल बिराजदार, एस के स्वामी, मल्लिनाथ कोगनुरे, शावरेप्पा माणकोजी, कल्याण देशमुख, विशाल घाडगे, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button