स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

महेश इंगळे मंदिर समितीस लाभलेले बहुगुणी नेतृत्व – चंद्रकांत दादा मोरे

सौ.श्री.चंद्रकांत दादा मोरे यांचा सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.

महेश इंगळे मंदिर समितीस लाभलेले बहुगुणी नेतृत्व – चंद्रकांत दादा मोरे

प्रतिनिधी (अक्कलकोट), दि.२९/७/२३ – स्वामी भक्तीची व सेवा कार्याची परंपरा इंगळे कुटुंबीयांना लाभली असून त्या प्रेरणेतूनच महेश इंगळे हे वटवृक्ष मंदिर समितीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून स्वामी सेवेतच आपले दैनंदिन जीवन व्यतीत करणारे व्यक्तीमत्व असून यापेक्षा मोठे भाग्य ते काय ? यामुळे महेश इंगळे म्हणजे वटवृक्ष मंदिर समितीस लाभलेले बहुगुणी नेतृत्व होय. त्यांच्या या उमद्या व प्रभावी व्यक्तीमत्वामुळे त्यांना वटवृक्ष मंदिर समितीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून स्वामी सेवेची संधी लाभली असल्याचे मनोगत त्र्यंबकेश्वर गुरुपीठकृत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे प्रमुख चंद्रकांत दादा मोरे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास सपत्निक भेट देवून श्री स्वामी समर्थाचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी सौ.व श्री. चंद्रकांत दादा मोरे यांचा स्वामीचे कृपावस्त्र, प्रसाद, देवून यथोचित सन्मान केला. यावेळी चंद्रकांत दादा बोलत होते. या प्रसंगी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, प्रथमेश इंगळे, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, विपूल जाधव, गिरीश पवार, नितीन कोळी इत्यादी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ = सौ.श्री.चंद्रकांत दादा मोरे यांचा सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button